मोगॅम्बो खलनायक हुआ! अमरीश पुरी यांना व्हायचं होतं हीरो, पण...

अमरीश पुरीयांनी एकापेक्षा एक खलनायकाची सशक्त भूमिका साकारली असून त्यांना सुपर खलनायक म्हटले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? अमरीश पुरी यांना कधीही खलनायक बनायचे नव्हते.
amrish puri memories
amrish puri memoriesSaam Tv

मुंबई : गदर चित्रपटातील 'अश्रफ अली' असो, करण अर्जुनचा 'ठाकूर' असो किंवा 'मिस्टर इंडियामधील मोगॅम्बो' असो, दिवंगत (actor) अभिनेते 'अमरीश पुरी'(Amrish Puri) यांनी आपल्या कारकिर्दीत अशी अनेक दमदार पात्र साकारली आहेत. त्यांच्या या व्यक्तिरेखांमुळे त्यांना कोणीही विसरू शकत नाही. चित्रपटांतील(movie) खलनायकांची गणना केल्यावर अमरीश पुरीयांचे नाव अग्रक्रमावर लिहिले जाईल. कारण त्याच्या कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक खलनायकाची सशक्त भूमिका साकारली असून त्यांना सुपर खलनायक(villain) म्हटले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? अमरीश पुरी यांना कधीही खलनायक बनायचे नव्हते.

amrish puri memories
#BoycottBrahmastra का होतोय ट्रेंड? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा

अमरीश पुरी यांना खलनायक व्हायचे नव्हते...

चित्रपटात काम करण्याचे स्वप्न घेऊन माणूस जेव्हा मुंबईत येतो तेव्हा त्याची एकच इच्छा असते ते म्हणजे आपण सुपरहिटहिरो व्हावं,अमरीश पुरी यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण अमरीश पुरी खलनायक झाले.

amrish puri memories
Sonam Kapoor Baby Shower: सोनम कपूरचं डोहाळे जेवण; लंडनमध्ये वाजलं 'मसकली'

तुमचा चेहरा हिरोसारखा दिसत नाही...

अमरीश पुरी त्यांचे दोन मोठे भाऊ मदन पुरी आणि चमन पुरी देखील चित्रपटांमध्ये काम करायचे. या दोघांमुळे अमरीश पुरीयांना सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिका मिळू लागल्या.पण हिरो बनण्याचे स्वप्न त्यांच्या हृदयात कायम होते. परंतु ते जेव्हा निर्मात्यांकडे हिरोच्या भूमिकेसाठीऑडिशन द्यायला जायचे तेव्हा त्यांना पाहून 'तुझा चेहरा हिरोसारखा दिसत नाही' असे चित्रपटाचे निर्माते म्हणायचे. अमरीश पुरी हे ऐकून खूप निराश व्हायचे.परंतु नंतर त्यांना नायकच्या नाही पण खलनायकाच्या भूमिका मिळू लागल्या, ज्या त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे साकारल्या की ते चित्रपटसृष्टीत सर्वात मोठा खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com