
Maharashtracha Favourite Kon Award: गेल्या वर्षी महाराष्ट्रात अनेक मराठी चित्रपटांचा बोलबाला महाराष्ट्रात दिसला. अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. पण आता सर्वच चाहत्यांना वेध लागलेत ते महाराष्ट्राची फेवरेट कोण अभिनेत्री जाणून घेण्याची. अनेक मराठी अभिनेत्रींनी गेल्या वर्षात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. आता कोण २०२२ची महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री बनणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
झी टॉकीज वाहिनीतर्फे १५ डिसेंबरला 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्काराची नामांकने जाहीर करण्यात आली. यामध्ये 'महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री कोण?' या विभागात अभिनेत्री अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, हृता दुर्गुळे, रितिका श्रोत्री आणि वैदेही परशुरामी यांच्यात बरीच चुरस रंगली. अखेर हा मान अवघ्या महाराष्ट्राला चंद्राच्या तालावर ठेका धरायला लावणाऱ्या अमृताला मिळाला.
अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या दिलखेचक अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करत असते. अमृताला यावर्षी महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री कोण? हा पुरस्कार मिळाला. अमृताला 'चंद्रमुखी' चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटातील चंद्रा गाण्याची चर्चा आजही सर्वत्र कायम आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केली होती.
आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अमृताने चंद्रमुखी ही व्यक्तीरेखा साकारत लावणी, तमासगीर कलावंतीणीचं आयुष्य, प्रेमासाठीची व्याकुळता दाखवण्यात सगळं कौशल्य पणाला लावलं. या सिनेमाने अमृताच्या अभिनय आणि नृत्यकलेचंही कौतुक झालं. त्यामुळे 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब तिने पटकावला.
सिनेमा निर्मितीपासून सिनेमा प्रदर्शनापर्यंत आणि अनेक वैविध्यपूर्ण व प्रयोगशील कार्यक्रमाची नांदी सादर करणाऱ्या झी टॉकीज वाहिनीच्या पडद्यावर काही दिवसांतच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कार सोहळा प्रक्षेपित होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.