Adipurush Controversy: 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप; चित्रपटातील प्रभासचा लूकची झाली चोरी?

Prabhas Look From Movie: रामचा लूक पाहिल्यानंतर एका आर्टिस्टने निर्मात्यांवर चोरीचा आरोप केला आहे.
Prabhas Look From Movie Adipurush Is Stolen
Prabhas Look From Movie Adipurush Is StolenSaam TV

Prabhas Look From Movie Adipurush Is Stolen: प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष वादाच्या कचाट्यात सापडला आहे. चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून कलाकारांच्या लूकवर बरीच टीका होत आहे. त्यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि लूक वरून आता नवा वाद सुरू झाला आहे.

पोस्टरमध्ये प्रभू रामाच्या अंगावर जानवं आणि सीतेच्या भांगात सिंदूर दिसत नाही, असा आरोप पोस्टर पाहून करण्यात आला होता. दुसरीकडे, हनुमान जयंतीला हनुमानाचे पोस्टर रिलीज झाले तेव्हा त्याच्या लूकबद्दल निर्मात्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. आता या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रामचा लूक पाहिल्यानंतर एका आर्टिस्टने त्यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे.

चित्रपटाचा टीझर आणि आता पोस्टरवरून बराच वाद निर्माण होत आहे. रविवारी प्रतीक संघर नावाच्या कलाकाराने रेडिटवर त्याच्या कलाकृतीचा स्क्रीन शॉट शेअर केला. यासोबतच त्याने स्वत:ला चित्रपटाचा डिझायनर म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीची फेसबुक पोस्टही शेअर केली आहे. टीपी विजयन नावाच्या या व्यक्तीने गेल्या वर्षी प्रभासच्या वाढदिवसाला ही फेसबुक पोस्ट शेअर केली होती.

Prabhas Look From Movie Adipurush Is Stolen
Allu Arjun Fees: फायर हूं मैं फायर! 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुनने घेतले बक्कळ मानधन; तेलुगू सिनेसृष्टीतील ठरला सर्वात महागडा अभिनेता

त्यांच्या पोस्टमध्ये दिसणारी कलाकृती प्रतीकच्या कलाकृतीशी मिळती-जुळती आहे. टीपी विजयन यांची ही पोस्ट 23 ऑक्टोबर 2022 ची आहे. पोस्टमध्ये विजयन यांनी लिहिले की, 'आदिपुरुष चित्रपटासाठी मी बनवलेल्या कलेचा खास लूक. हे पोस्टर पाहून प्रतीक संघारने नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, 'आदिपुरुषच्या टीमने माझ्या कलाकृतीची कॉपी केली आहे आणि मला याची कोणतीही माहिती किंवा पैसे दिलेले नाहीत'.

प्रतीकने टीपी विजयन यांची फेसबुक पोस्ट आणि कलाकृती शेअर केली. त्यांनी लिहिले, 'मी भारतातील एक कलाकार आहे. मी रामायणासाठी रामाचा लूक तयार केला होता, कदाचित ते कधीतरी तयार होईल असे वाटले. ही गोष्ट साधारण वर्षभरापूर्वीची आहे. आदिपुरुषच्या अधिकृत संकल्पनेतील कलाकाराने माझी कलाकृती चोरली आणि ती माझ्या कलाकृतीसारखी कलाकृती बनवली. त्यामुळे त्यांचे प्रोजेक्ट अयशस्वी झाले.'

मात्र, या आरोपांवर आदिपुरुषच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राम नवमीला रिलीज झालेल्या चित्रपटाच्या नवीन पोस्टरवर संजय दीनानाथ तिवारी यांनी निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. आदिपुरुषमध्ये प्रभासशिवाय क्रिती सेनॉन, सैफ अली खान, देवदत्त नागे आणि सनी सिंग हे कलाकार दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com