Anand Remake: आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..; रुपेरी पडद्यावर पुन्हा येताेय 'आनंद'

आनंद चित्रपटच्या रिमेकची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांनी अजूनही या चित्रपटात काेण कलाकार असतील या माहिती दिलेली नाही.
Amitabh Bachchan Latest Movie, Rajesh Khanna In Anand, Anand Movie Remake Latest Marathi News, Entertainment News
Amitabh Bachchan Latest Movie, Rajesh Khanna In Anand, Anand Movie Remake Latest Marathi News, Entertainment News saam tv

सातारा : "बाबूमोशाय , ज़िंदगी और मौत ऊपरवाले के हाथ है…उसे न आप बदल सकते हैं न मैं!", आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं अशा स्वरुपाचे डायलाॅग ५० वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या कानी पडणार आहेत. बाॅलिवडूचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या आनंद (Anand) या चित्रपटाचा (movie) रिमेक (anand remake) हाेणार आहे. याची निर्मिती एन सी सिप्पी (nc sippy) यांचा नातू म्हणजेच समीर राज सिप्पी (Sameer Raj Sippy) आणि विक्रम खाखर (Vikram Khakhar) हे करणार आहेत. (Remake of Anand Latest Marathi News)

राजेश खन्ना, अभिताभ बच्चन, सुमिता सनयाल, रमेश देव, ललिता पवार यासह अन्य दिग्गज कलाकरांचा समावेश असलेला आनंद चित्रपटाने ५१ वर्ष पुणे केली. या चित्रपटातील संवाद आजही अनेकांचे ताेंडपाठ आहेत. आज तरण आदर्श (taran adarsh) यांनी आनंदच्या रिमेकबाबत ट्विट केले आहे. तसेच विक्रम खाखर यांनी काही विशेष चित्रपटांच्या यादीत आनंदचा समावेश आहे. काेविडच्या काळानंतर आनंदचा रिमेक हा सर्वांच्या आयुष्यातील आनंद वाढवेल असे म्हटलंय.

Amitabh Bachchan Latest Movie, Rajesh Khanna In Anand, Anand Movie Remake Latest Marathi News, Entertainment News
Gyanvapi Mosque Case: 'ज्ञानवापी' प्रकरणी आदेश करु नये; SC ची वाराणसी न्यायालयास सूचना

आनंदची कथा नव्या पिढीला समजली पाहिजे. आनंदच्या रिमेकमधून नव्या पिढीसमोर एक चांगले कथानक पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे निर्माते समीर राज सिप्पी यांनी म्हटले आहे.

Amitabh Bachchan Latest Movie, Rajesh Khanna In Anand, Anand Movie Remake Latest Marathi News, Entertainment News
OBC Reservation: ओबीसींना दिलासा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मिळाले आरक्षण

आनंद सिनेमातील संवाद आणि गाण्यांनी लाेकांना खूप भूरळ घातली हाेती. आता पुन्हा आनंद येत असल्याने नव्या पिढीला त्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळेच आज आनंदचा ट्विटरवर ट्रेंड हाेता.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com