Marathi Serial Goes Off Air: अंतरा - मल्हारचा प्रेक्षकांचा अलविदा; 'जीव माझा गुंतला' मालिकेचा प्रवास संपला

Jeev Majha Guntala: मालिकेचा आज शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे.
Jeev Majha Guntala
Jeev Majha Guntalasaam Tv

Jeev Majha Guntala Goes Off Air:

कलर्स मराठीवरील मालिका 'जीव माझा गुंतला' आज प्रेक्षकांनाच निरोप घेणार आहे. मालिकेचा आज शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. मराठी टेली बझ या इंस्टाग्राम पेजच्या पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

अंतरा आणि मल्हार यांची 'जीव माझा गुंतला' ही मालिका २१ जून २०२१ पासून कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे. या मालिकेला सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. रिक्षा चालवणारी अंतर आणि बिजनेसमॅन मल्हार यांची ही कथा होती.

Jeev Majha Guntala
Attack On Actor: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर फॅनचा हल्ला; VIDEO व्हायरल

अंतरा आणि मल्हार यांच्या जीवनात अनेक वादळ आली. कधी दोघे एकमेकांच्यासोबत तर कधी एकमेकांच्या विरुद्ध लढले. समज, गैरसमज पार करत दोघे एकत्र आले. कधी प्रेक्षकांनी मालिकेचे कौतुक केले तर कधी मालिकेवर टीका केली. आज ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांची आवडली मालिका रंग माझा वेगळाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता आणखी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अवधूत गुप्तेचा 'खुपते तिथे गुप्ते'चा देखील ता रविवारी शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

कलर्स मराठीवरील रिअॅलिटी शो ढोलकीच्या तालावरचा फिनाले लवकरच पार पडणार आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादला देखील लवकरच त्याचा विजेता मिळणार आहे. (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com