
‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkaar) नंतर अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ (Animal) चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेमुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ यांच्यासोबत हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार होता. पण दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर होणारी चर्चा पाहता, निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेतबदल केला. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपटाचा टीझर येत्या २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाची एक झलक अर्थात प्री- टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची प्रचंड क्रेझ चाहत्यांना प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेतबद्दल केला आहे. चित्रपट या वर्ष अखेरीस अर्थात १ डिसेंबरला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाविषयी प्रत्येक अपडेटवर चाहते लक्ष देऊन आहेत. रणबीर कपूरसह चित्रपटामध्ये नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
पिंकव्हीलाच्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या टीझरविषयी नुकतीच नवीन माहिती समोर आली आहे. येत्या २८ सप्टेंबरला या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाचा टीझर अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी असून ते चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतरच चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनला निर्मात्यांसह दिग्दर्शक आणि कलाकार २ महिने आधीपासूनच प्रमोशनला सुरुवात करणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांमध्ये या चित्रपटात रणबीरसोबत परिणीती चोप्रा दिसणार असल्याची चर्चा होत होती. पण चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. पहिल्यांदाच चित्रपटामध्ये, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना ही जोडी एकत्र दिसणार आहे. दरम्यान टीझर नक्की, २८ सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार का?, अद्याप याबद्दलची माहिती गुलदस्त्यात आहे. टीझरबद्दलची माहिती प्रेक्षकांना, रणबीरच्या वाढदिवशीच मिळेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.