केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; आणखी एक ठिकाणी गुन्हा दाखल

निखिल भांबरे याने धमकीची पोस्ट ट्विट केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; आणखी एक ठिकाणी गुन्हा दाखल
Ketaki ChitaleSaam tv

मुंबई - मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. केतकी चितळे विरोधात भोईवाडा पोलीस (Police) ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीसह निखिल भांबरे या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल भांबरे याने धमकीची पोस्ट ट्विट केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

केतकी चितळे विरोधात आतापर्यंत ९ गुन्ह्याची नोंद झाली असून हा दहावा गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिका केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे भोईवाडा पोलीस ठाण्यात केतकी आणि निखिल विरोधात कलम १५३ (अ),५००, ५०१,५०४,५०६, ३४ भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Ketaki Chitale
TET Exam Scam: टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रितिश देशमुखला जामीन मंजूर

याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, नाशिक, अमरावती आणि मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान केतकी चितळे हिला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आज सकाळी ११ वाजता केतकीला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर केतकीला दिलासा मिळतो की अडचणी वाढणार याकडं लक्ष लागलं आहे.

तसेच निखिल भामरेच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा देखील तपास ठाणे पोलीस करीत आहेत. त्यासाठी एक पथक नाशिक येथे जाणार आहे. त्यामुळे भामरे याला देखील ठाणे पोलीस अटक करण्याची शक्यता आहे.

Edited By -Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.