Anupamaa : अनुपमा आणि अनुजच्या प्रेमात नवा ट्विस्ट; बरखाने रचलं कटकारस्थान

स्टार प्लस वाहिनीवरील 'अनुपमा' (Anupamaa) ही मालिका (Serial) सध्या चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.
Anupamaa : अनुपमा आणि अनुजच्या प्रेमात नवा ट्विस्ट; बरखाने रचलं कटकारस्थान
Anupamaa serial Instagram

मुंबई : स्टार प्लस वाहिनीवरील 'अनुपमा' (Anupamaa) ही मालिका (Serial) सध्या चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. या मालिकेत 'रुपाली गांगुली' (Rupali Ganguly) ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेमध्ये रोज काही-ना-काही ट्विस्ट घडतंच असतो. या मालिकेचा प्रेक्षक भरभरून आनंद घेत असतात. काल देखील मालिकेमध्ये असाच एक किस्सा घडला आहे. अनुपमा आणि अनुज याच्या मधील प्रेमामध्ये (Love) कटकारस्थान तर करणार नाही ना ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेतून मिळणार आहेत. त्यामुळे ही मालिका चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ( anupamaa Serial News )

Anupamaa serial
नवरदेवाशिवाय लग्न पार पडलं, तिने स्वतःच्याच भांगेत सिंदूर भरलं... (पाहा Photos)

अनुपमाच्या कालच्या भागात दाखवले की , अनुपमा नाश्ता बनवते,तेवढ्यात अनुज जॉगिंग करून घरी येतो आणि अनुपमा त्याचे कौतुक करतो. तेव्हाच तो तिला आठवण करून देतो की ,'थेपला' जळत आहे .अनुपमा, मात्र अनुजला तिचं लक्ष्य विचलित केल्याबद्दल दोष देते. अनुज अनुपमाच्या कपाळाचे चुंबन घेतो. तेवढ्यात बरखा त्याला गुड मॉर्निंग म्हणत स्वयंपाक घरात येते. बरखा त्या दोघांना सांगते की ती सकाळी तेलकट पदार्थ खात नाही.

अनुज बरखाला सांगतो की, त्याला माहिती आहे की तिला हा तेलकट नाश्ता आवडत नाही म्हणून अनुपमाने तिच्यासाठी काहीतरी वेगळं बनवले असते. अनुपमा तिला सांगते की, तिने पॅनकेक्स बनवले आहेत. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. त्यानंतर बरखा त्या दोघांना सारा व अधिक हे पाहुणे आल्याचे सांगते. अनुपमा आनंदाने धावत जाऊन दार उघडते आणि त्यांचे औक्षण करताना भावुक होते. अनुज हा अधिक आणि साराला काळजी करू नका,अनुपमा खूप भावनिक आहे असं सांगतो. सारा अनुपमाला सांगते की,ती अनुपमाची चाहती आहे.कारण ती त्याच्या डान्सला फॉलो करते आणि त्याचा व्हिडीओ पसंत करते. हे ऐकून अनुपमा रडू लागते आणि तेव्हाच सारा ही अनुपमाचे कौतुक करते. थोड्यावेळाने अनुपमा ही अधिक आणि साराला घरात घेऊन जाते.

Anupamaa serial
बॉलिवूड अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर, ओळखणंही झालं कठीण, दुःखद कहाणी सांगताना झाली भावुक

दुसरीकडे, शाह कुटुंबातील सदस्य बा यांच्या माहेरून परतले. बा सांगते की तिला अनुपमाची खूप आठवण येत आहे. समर तिला काळजी करू नकोस असं सांगतो.कारण,अनुपमा आणि अनुज येथे पाचपरतवणेसाठी येणार आहेत. हे ऐकून बापूजी खूश होतात. तेच इथे बरखा, अंकुश, सारा, अधिक, अनुज आणि अनुपमा बसून एकत्र छान वेळ घालवतात. दुसरीकडे, वनराज हा त्याचा आईला नावाची पाटी भेट देतो ज्यावर आईचे नाव लिहिलेले होते. तो सांगतो की, अनुपमामुळेच त्याला समजले की स्त्रिया देखील पुरुषांप्रमाणे घर चालवतात. त्याची आई आनंदी होते आणि म्हणते की, ती पुन्हा स्वतःलाचं घराच्या किल्ल्या भेट देईल. बरखा सांगते की, तिने एक पार्टी आयोजित केली आहे. अनुज तिला पार्टी पुढे ढकलण्यास सांगतो. कारण,त्याला आणि अनुपमाला तिच्या घरी जायचे आहे. बरखा चिडते आणि विचार करते की,ती अनुपमाला घर आणि व्यवसाय चालवू देणार नाही. ती तिचा स्वतःची काम करून घेण्यासाठीच वापर करेल'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com