Anurag Kashyap On PM Modi’s Remark : मोदींच्या वक्तव्यावर अनुराग कश्यपची प्रतिक्रिया, म्हणाला '४ वर्षांपूर्वी फरक पडला असता, आता...'

पीएम मोदींच्या या वक्तव्यावर चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Anurag Kashyap
Anurag KashyapSaam Tv

Anurag Kashyap on PM Modi Statement: देशात बऱ्याच दिवसांपासून 'बॉयकॉट बॉलीवूड' ट्रेंड असा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नेत्यांना चित्रपटांवर अनावश्यक वक्तव्ये टाळावीत, असे सांगितले. आता पीएम मोदींच्या या वक्तव्यावर चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी मुंबईत अनुराग यांच्या 'ऑलमोस्ट लव्ह विथ डीजे मोहब्बत' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Anurag Kashyap
Ved Movie: रितेश-जेनेलियानं अख्ख्या महाराष्ट्राला 'वेड' लावलं; चित्रपटाची सैराट कामगिरी

ट्रेलर लाँचच्या वेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग कश्यप म्हणाला, “जर त्यांनी हे 4 वर्षांपूर्वी सांगितले असते तर खरोखरच फरक पडला असता. आत्ता मला वाटत नाही की कोणीही आता स्वतःच्या लोकांवर नियंत्रण ठेवू शकेल...गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. आता कोणी कोणाचे ऐकेल असे वाटत नाही. जेव्हा तुम्ही मौनाने पूर्वग्रह मजबूत करता, जेव्हा तुम्ही शांततेने द्वेष वाढवता. आता द्वेष इतकी खंबीर झाली आहे की स्वतःच (द्वेष) एक शक्ती बनला आहे."

झी स्टुडिओचे प्रमुख शारिक पटेल म्हणाले, “काही आठवड्यांपूर्वी आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी मुंबईत बैठक घेतली होती. खूप छान अनुभव होता. हे काय आणि का होत आहे हे कोणालाच समजत नसले तरी माननीय पंतप्रधानांनी हा आदेश दिला असेल तर नक्कीच फरक पडेल. मला आशा आहे की अनुरागचे म्हणणे चुकीचे सिद्ध होईल आणि द्वेष पसरवणे थांबेल. चित्रपटांचा उद्देश केवळ लोकांचे मनोरंजन करणे हाच असतो हे उघड आहे. अशा परिस्थितीत काही वेळा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट चांगले बनतात, तर काही चित्रपटांमध्ये उणिवा असतात. पण त्यात काही नुकसान नाही.

दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला की चित्रपटांवर अनावश्यक टिप्पणी टाळावी. ते म्हणाले की, असे मुद्दे शक्यतो टाळलेलेच बरे. यासोबतच अशा प्रकारच्या टिप्पण्यांमुळे विकासाचा अजेंडा थंड पडतो, असेही पंतप्रधान म्हणाले.

अलिकडच्या काळात असे अनेक चित्रपट आले, ज्यांना सोशल मीडियासह अनेक नेत्यांनी विरोध केला. बॉयकॉट बॉलीवूड या ट्रेंडमुळे अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाहीत, असा आरोप होत आहे. आता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठान' या चित्रपटाविरोधातही तेच घडत आहे. या चित्रपटालाही जोरदार विरोध होत आहे. दरम्यान, पंतप्रधानांचे वक्तव्याची बरीच चर्चा होत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी चित्रपटाच्या कमाईमध्ये फरक पडेल किंवा पुढील चित्रपटांना विरोध करताना नेतेमंडळी विचार करतील अशी अपेक्षा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com