
Anushka Sharma Viral Video: अभिनेत्री अनुष्का शर्मा विविध कारणांनी चर्चेत असते. अनुष्का मुंबईच्या रस्त्यावर दिसल्याने वेगळी चर्चा रंगली आहे. अनुष्का मुंबईच्या रस्त्यांवर अशी का फिरत होती असे प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना पडले आहेत.
अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. अनुष्का मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट झाली आहे. पापाराझींनी तिला त्यांच्या कॅमेरात कैद केले आणि शेअर केले. (Latest Entertainment News)
अनुष्का शर्माला पापाराझींनी एका डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट केले. यावेळी ती तिचा बॉडीगार्ड सोनूसोबत होती. सोनूसोबत ती जुहू येथे बाईकवर दिसली. यावेळी तिच्या स्टाईलने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
परंतु यावेळी अनुष्काकडून एक चूक झाला. अनुष्काचा बॉडीगार्ड यावेळी विना हेल्मेट होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. तसेवेचं अनेकांनी हेल्मेट कुठे आहे, असा प्रश्न केला आहे.
या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एकानं लिहिलयं की, 'ना मॅडमने हेल्मेट घातलयं ना तिच्या बॉडिगार्डने..', तर दुसऱ्यांने लिहिलयं की, 'मुंबईत हेल्मेट गरजेचं नाही का?', इतकच नाही तर एकानं लिहिलयं की, '@mumbaipolice काल अमिताभ बच्चन यांनी विना हेल्मेट पोस्ट केली होती.
आज ह अनुष्काचा हा व्हिडिओ हे दोघंही विना हेल्मेट फिरण्याचा संदेश देत आहे. तुम्ही यांच्यावर कारवाई करा..'
जुहूच्या रस्त्यावर झाड पडल्याने ट्रॅफिक झाल्याने रस्ते ब्लॉक झाले होते. त्यामुळे अनुष्काने हा पर्याय निवडला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.