Janhvi Kapoor Boyfried : रिलेशनशिपबद्दल जान्हवी कपूरचा खुलासा; म्हणाली, फक्त जवळीक...

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर तिचा 'गुड लक जेरी' चित्रपट रीलीज झाल्यापासून तुफान चर्चेत आहे. अभिनयाव्यतिरिक्त जान्हवी आजकाल तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे देखील चर्चेत आहे.
Janhvi Kapoor Image
Janhvi Kapoor ImageSaam Tv

Janhvi Kapoor Bollywood News | मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) तिचा 'गुड लक जेरी'(Good Luck Jeery) चित्रपट रीलीज झाल्यापासून तुफान चर्चेत आहे. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात जान्हवी एका साध्या बिहारी मुलीची भूमिका साकारत आहे, जी तिच्या आईचे उपचार करण्यासाठी ड्रग माफिया बनते. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त जान्हवी आजकाल तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे देखील चर्चेत आहे. तिच्या रिलेशनशिपच्या सर्व अफवांना पूर्णविराम देत, जान्हवीने अलीकडेच एका चॅट शोमध्ये तिच्या सिंगल असण्यावर शिक्कामोर्तब केले.

Janhvi Kapoor Image
Sussanne-Arslan Wedding: हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी करणार दुसरं लग्न; कोण आहे तिचा लाइफ पार्टनर?

रिलेशनशिपमध्ये आहे का, असा प्रश्न नुकत्याच एका यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर जान्हवी म्हणाली, 'मी सिंगल आहे आणि खूश आहे. मला कधीकधी एकटं राहायला आवडतं. मला कोणी डेटसाठी विचारलं नाही. मला वाटते की आजकाल लोकांसाठी सर्व काही सोपे झाले आहे. आजकाल लोक रिलेशनशिपमध्ये राहू इच्छितात. त्यांना फक्त जवळीक साधायची असते, त्यामुळेच लोक एकमेकांपासून लवकर दूर जातात'.

जान्हवीला तिच्या भावी बॉयफ्रेंडला एक मेसेज पाठवण्यासही सांगण्यात आले होते. जान्हवीने तिच्या बॉयफ्रेंडसाठी एक खास मेसेज पाठवला होता. 'माझ्याशी चांगले वाग आणि मला खूप हसव. मी पण तुझ्याशी खूप छान वागेन. मी तुला खूश ठेवीन. तुला माझ्यासोबत खूप मजा येईल. मी थोडी वेडी आहे पण गोंडसही आहे', असा क्यूट मेसेज जान्हवीने तिच्या भावी बॉयफ्रेंडला पाठवला आहे.

Janhvi Kapoor Image
Karan Mehra-Nisha Rawal Case: करण मेहराला हवाय आता मुलाचा ताबा, म्हणाला...

जेव्हा जान्हवीने बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा तिच्या 'धडक' चित्रपटातील सहकलाकार ईशान खट्टरला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दोघे अनेकदा एकत्र हँगआउट करताना दिसले होते. इतकेच नाही तर, जान्हवी अनेकदा ईशानचा भाऊ शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतसोबत वेळ घालवताना दिसली. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचे लवकरच ब्रेकअप झाले. अलीकडेच जान्हवी कॉफी विथ करण सीझन ७ मध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान होस्ट करण जोहरने खुलासा केला की, जान्हवी आणि सारा अली खान एकदा दोन भावांना डेट करत होत्या. सारा आणि जान्हवीला डेट करणारे दोन भाऊ त्याच्या बिल्डिंगमध्येच राहत असल्याचेही त्याने उघड केले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com