
Apurva Nemlekar Emotional Post: रात्रीस खेळ चाले फेम अपूर्वा नेमळेकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. शेवंता पात्र साकारत अवघ्या मराठी प्रेक्षकांवर राज्य करणाऱ्या अपुर्वाच्या लहान भावाचे १५ एप्रिलला वयाच्या २८ व्या वर्षी निधन झाले.
नेहमीच रोखठोक स्वभाव आणि तितकीच प्रेमळ अपूर्वा येत्या काळात विविध कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. भावाच्या निधनामुळे अपूर्वा पुन्हा एकदा भावनिक झाली असून तिने सोशल मीडियावर भावाचे फोटो शेयर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अपूर्वा म्हणते, “प्रिय ओंकार... आयुष्यात कधी कधी आपलं इतकं मोठं नुकसान होतं. जे कधीही भरून निघू शकत नाही. तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. मला तुला इतक्यात गुड बाय म्हणायचं नव्हतं.. मला तुला गमवायचं नव्हतं.. तुझ्या सोबतचा क्षण मिळावा म्हणून कोणतीही गोष्ट द्यायला तयार आहे. पण तुझ्या जाण्याने मृत्यू बद्दलची एक गोष्ट समजली. ती म्हणजे माणूस गेला तरी प्रेम कधीही मरत नाही. या घटनेमुळे मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले.”
“काही बंध कधीच तोडता येत नाहीत. आज शरीराने इथे नसलास तरी तुझं हृदय माझ्या आत जपून ठेवलंय. तुझं हृदय माझ्यासोबत आहे आणि मी ते कायम माझ्या सोबत ठेवेल. जे मला आयुष्यात खूप धीर देईल. पुढे जायला बळ देईल. कधीतरी आपण पुन्हा भेटूच तेव्हा जिथे किंवा जागेचं बंधन नसेल. तोवर तुझं हृदय मी माझ्यात जपून ठेवेल. कारण त्या दिवसापर्यंत, तू माझ्यासोबत आहेस ही जाणीव मला उभारी देईल. आपलं हृदय एक आहे, ते कधीही वेगळं होणार नाही. माझं तुझ्यावर तेव्हाही प्रेम होतं,आताही आहे आणि उद्याही राहील. माझ्या बाळा. माझ्या भावा. लवकरच आपण भेटूया...” भावाच्या आठवणीत व्याकूळ होत तिने ही खास पोस्ट लिहिली आहे.
१५ एप्रिल रोजी अपूर्वाच्या लहान भावाचे म्हणजे ओंकार नेमळेकरचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले होते. अपूर्वाच्या आयुष्यात त्याच्या अचानक एक्झिटने खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेनंतर आयुष्यातील हा फार मोठा धक्का सहन न झाल्याने तिच्या लहान बहिणीची प्रकृतीही अचानक बिघडली होती. त्यामुळे अपूर्वासाठी हा काळ अत्यंत कठीण होता. आज तिच्या भावाच्या निधनाला एक महिना झालाय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.