A.R. Rahman On Indian Cinema: 'भारतातून ऑस्करला चुकीचे चित्रपट पाठवले जातात', ए.आर. रहमानचे मोठे वक्तव्य

रहमान देशाने अकादमी पुरस्कारासाठी पाठवलेल्या चित्रपटांवर आपले मत मांडले आहे.
A.R. Rahman On Oscars Award
A.R. Rahman On Oscars Award Saam Tv

A.R. Rahman On Oscars Award: सिनेसृष्टीतील सर्वात मोठा आणि समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा १२ मार्च रोजी पार पडला भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सोहळा १३ मार्चला सकाळी ५:३० वाजता हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविण्यात आला.

९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळयात आरआरआर चित्रपटातील 'नाटु नाटु' या गाण्याला मूळ गाणे (Original Song) या विभागात पुरस्कार मिळाला. भारतीय निर्मिती असलेला लघुपट 'द एलिफंट व्हिस्पर'ला सर्वोत्तम लघुपट हा पुरस्कार मिळाला.

A.R. Rahman On Oscars Award
Maharashtra Shaheer: ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या भूमिकेत दिसणार लोकप्रिय अभिनेत्री

भारताच्या शिरपेचात दोन मनाचे तुरे रोवण्यात आले. तसेच भारतीय चित्रपट जागतिक दर्जाचे आहेत आहे या निमित्त दिसून आले. दरम्यान दोन ऑस्कर जिंकलेल्या संगीतकार ए.आर. रहमान यांची मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. या मुलाखतीत रहमान देशाने अकादमी पुरस्कारासाठी पाठवलेल्या चित्रपटांवर आपले मत मांडले आहे.

मुलाखतीदरम्यान रहमान अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देताना दिसत आहे. मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारले गेले की त्यांनी संगीतकार आणि वाद्यवृंदांसह गाणी रेकॉर्ड करण्याची पद्धत कशी बदलली, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी स्पष्ट केले की चित्रपटांसाठी फक्त आठ ट्रॅक होते, परंतु जिंगल जी बॅकग्राउंडमध्ये वाजते, त्यामुळे त्यांच्याकडे 16 ट्रॅक झाले, म्हणून त्यांना विविध प्रयोग करता आले.

या मुलाखतीत रहमान यांनी ऑस्करसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांबद्दलही भाष्य केले आहे. रहमान म्हणाले की, 'भारतीय चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जातात, पण त्यांना यश मिळत नाही, हे मी पहिले आहे. ऑस्करसाठी भारतातून चुकीचे चित्रपट पाठवले जात असल्याचे मला वाटते. आपल्याला इतरांच्या दृष्टीकोनातून विचार करावा लागतो.'

ए.आर. रहमान यांची ही मुलाखत जानेवारीची आहे, जी 15 मार्च रोजी एआर रहमानच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com