
करीना कपूर, कियारा अडवाणी आणि सुहाना खान यांनी नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. हा इव्हेंट होता अंबानींच्या लेकीचा. इशा अंबानीचे ब्युटी प्रॉडक्ट पोर्टल टिरा काल लाँच झाले.
या इव्हेंटमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. गुड न्युज चित्रपटातील दोन को-स्टार करीना आणि कियारा एकमेंकींवर आदळताना हा व्हिडीओ आहे.
कियारा स्टेजवर माईक घेऊन बोलत असते. बोलतात बोलतात ती मागे येते आणि तिच्या कपड्यांमध्ये अडकते. त्यामुळे तिचा तोल जातो. इथे उभा असलेला अर्जुन कपूर तिच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्याने तिला सावरलं.
स्टेजवर धडपलेली कियारा आणि तिच्या मागे बसलेली करीना दोघीही खूप घाबरल्या. कियाराने स्वतःला सावरले आणि ती उभी राहिली.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेट कियारा आणि अर्जुन कपूरचे कौतुक होत आहे. नेकरी अर्जुन कपूरने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करत आहेत. तसेच कियाराने स्वतःला सावरून अगदी कॉन्फिडन्टली उभी राहिली याचे देखील कौतुक होत आहे.
अर्जुन उगाच बदनाम आहे, अर्जुनने किती सुंदरप्रकारे हे सांभाळलं अशा कमेंट नेटकरी अभिनेत्याबाबत करत आहेत.
तर कियाराने या हिल्स का घातल्या, तिने छान सावरलं, हिल्स घातल्यावर काय होत माहीत आहे, तिचा पाय ट्विस्ट झालेला नसावा अशा कमेंट नेटकरी कियारासाठी करत आहेत. (Latest Entertainment News)
करीना कपूर तिचा दिडगितलं डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. तिचा जाने जान२१ तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. तर बकींगहम मर्डर आणि द क्रू हे प्रोजेक्ट देखील प्रतीक्षेत आहेत.
कियारा अडवाणीचा नुकताच सत्यप्रेम की कथा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये ती कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. कियारा - कार्तिकचा हा दुसरा चित्रपट आहे. तर कियारा राम चरणसोबत गेम चेंजर या तेलगू चित्रपटामध्ये दिसणार आहे.
अर्जुन कपूरचा 'कुत्ते' हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला. आता तो द लेडी किलरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंग दिसणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.