"बिग बॉस" फेम सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

लखनऊ कोर्टाने सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट काढले आहे. तिच्या डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटांचे पैसे परत न केल्याचा आरोप
"बिग बॉस" फेम सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण
"बिग बॉस" फेम सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरणSaam Tv

वृत्तसंस्था : हरयाणामधील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचे Sapna Choudhary जगभराची चाहते आहेत. सपनाच्या डान्स आणि काही अदांमुळे ती चाहत्यांमध्ये नेहमी मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. पण यावेळी ती वेगळ्याच कारणांने चर्चेत आली आहे. लखनऊ कोर्टाने सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट काढले आहे. तिच्या डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे.

हे देखील पहा-

अ‍ॅडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शांतनू त्यागी यांनी हा वॉरंट जारी केले आहे. त्याची सुनावणी २२ नोव्हेंबर दिवशी होणार आहे. हे प्रकरण ३ वर्षे जुने आहे. सपना विरोधामध्ये १४ ऑक्टोबर २०१८ दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये सपना बरोबर या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचा उल्लेख करण्यात आला होता.

आता याप्रकरणामध्ये लखनऊ कोर्टाने सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर २०१८ दिवशी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीचा एक कार्यक्रम होणार होता. याकरिता ३०० रुपये तिकीट शुल्क आकारण्यात आले होते. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तिकीटांची विक्री करण्यात आली होती.

"बिग बॉस" फेम सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण
दिल्लीनंतर 'या' राज्यात लॉकडाऊन: वाढत्या प्रदूषणावर सरकारने घेतला निर्णय

कार्यक्रमाकरिता हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. पण रात्रीचे १० वाजले तरी देखील सपना चौधरी आलीच नाही आणि त्यानंतर प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांना तिकीटाचे पैसेही परत केले गेले नाहीत. याप्रकरणात कोर्टाने ४ सप्टेंबर २०२१ दिवशी सपना चौधरीचा अर्ज फेटाळला होता.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com