
Arundhati-Isha Emotion Video: 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीमध्ये देखील मालिका टॉपला आहे. मालिकेत नवनवीन वळण येत असतात. पण प्रत्येक वळणावर मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतीच ईशाच्या साखरपुड्याची लगबग मालिकेत सुरू होती. तर सध्या मालिकेत ईशा आणि अरुंधतीचा एक इमोशनल सीन पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे तुमच्या डोळ्यातही पाणी येईल.
स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियावर 'आई कुठे काय करते' मालिकेतील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अरुंधती आणि ईशा यांच्या नात्यातील बॉण्ड दाखविण्यात आला आहे. (Latest Entertainment News)
व्हिडिओमध्ये अरुंधती तिच्या साड्यांची बॅग भरत असते. इतक्यात ईशा तिथे येथे. ईशा अरुंधतीला म्हणते, 'आई सर्व सद्य नको ना घेऊन जाऊस. कधी कधी मला झोप लागत नाही तेव्हा मी तुझी साडी कवटाळून झोपते. पटकन झोप लागते.' अरुंधती बॅग उघडते आणि ईशाला त्यातून साडी घ्यायला सांगते. ईशा बॅगेतून साडी घेते आणि कवटाळते.
यावेळी ईशा आणि अरुंधती दोघीही खूप इमोशनल होतात. आईजवळ नसल्याने तिच्या मायेची ऊब तिच्या साडीतून मिळवण्याचा प्रयत्न ईशा करते. हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक भावनिक क्षण असतो. तो या व्हिडिओतून दाखविण्यात आला आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अनिरुद्धच्या बिजनेस पार्टनर आली आहे. अभिनेत्री खुशी तावडे ही अनिरुद्ध बिजनेस पार्टनर आणि आशुतोषची बहीण वीणा आहे. तिच्या येण्याने देशमुख आणि केळकर घरात वादळ येणार असण्याची कुणकूण अरुंधतीला लागली आहे. अशी भीती अरुंधतीने आशुतोषजवळ बोलून दाखवली आहे. आता येणाऱ्या भागात मालिकेत अजून रंजक वळण पाहायला मिळणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.