Aryan Khan Case: इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापा
Aryan Khan Case: इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापाSaam Tv

Aryan Khan Case: इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापा

आर्यन बरोबरच आणखी ७ जणांना क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला काही दिवसाअगोदर ड्रग्स Drugs Case प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण आणखी गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे. आर्यन बरोबरच आणखी ७ जणांना क्रूझवरील Cruise रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर आता आणखी एका एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

हे देखील पहा-

हा व्यक्ती दुसरा कोणी नसून प्रोड्युसर इम्तियाज खत्री हा आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे. NCB ने मुंबई मधील बांद्रा या ठिकाणी छापा मारला आहे. दरम्यान इम्तियाज खत्री या प्रोड्युसरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्स देखील आढळून आले आहेत. रात्रीपासूनच NCB ही कारवाई करत होती. क्रूझ पार्टीत इम्तियाज खत्रीने हे ड्रग्स पुरवल्याचे सांगितले जात आहे.

Aryan Khan Case: इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापा
Petrol Diesel Price: पेट्रोलनंतर आता ‘या’ शहरात डिझेलचीही सेंच्युरी कायम

कारण तो अटक केलेल्या एका आरोपीच्या संपर्कात होता. त्याच्याशी व्हॉट्सऍप चॅट करत असल्याचे देखील सापडून आले आहे. इम्तियाज खत्री हा पेश्याने एक बिल्डर आहे. INK इंफ्रास्ट्रक्चर नावाची त्याची कंपनी आहे. इतकेच नव्हे तर त्याची वीवीआईपी यूनिवर्सल एंटरनेटमेंट नावाची सुद्धा कंपनी आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकरांना संधी दिली जाते. तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये पैशांची गुंतवणूक करतो. इतकेच नव्हे, तर मुंबईत त्याची एक क्रिकेट टीम देखील आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.