Big Breaking : आर्यन खानचा मुक्काम वाढला, 20 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

येत्या 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला पुढील निकाल देणार
Big Breaking : आर्यन खानचा मुक्काम वाढला, 20 ऑक्टोबरपर्यंत कोठडी
Big Breaking : आर्यन खानचा मुक्काम वाढला, 20 ऑक्टोबरपर्यंत कोठडीSaam Tv

मुंबईहून गोव्याकडे Mumbai To Goa जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये Cruz Drugs Party ड्रग पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान तसेच इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे. येत्या 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला पुढील निकाल देणार आहे. आर्यनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर कोर्टात आज सुनावणी झाली. यावेळी एनसीबीसह सर्वांच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. पण कोर्टाने आजचे निर्णय न देता यावर विचार करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगत २० ऑक्टोबरपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यन खानसह इतरांना आता सहा दिवस ऑर्थर रोड तुरुंगातच रहावे लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.