Ashish Vidyarthi Ex Wife Post: आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीने व्यक्त केल्या भावना, म्हणाली 'योग्य व्यक्तीच तुम्हाला...'

Ashish Vidyarthi Shares Her Feelings: आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी राजोशी बरुआ हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Ashish Vidyarthi Wedding Wife Post
Ashish Vidyarthi Wedding Wife PostSaam Tv

अनेक चित्रपटनामध्ये खलनायकाची भूमिका साकारलेले अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी दुसरे लग्न केलं आहे. वयाच्या ६० व्या त्यांनी आसामच्या रुपाली बरुआशी लग्न केले आहे. अभिनेत्याचे अभिनंदन करताना आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी राजोशी बरुआ हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीने लिहिले की, 'योग व्यक्‍ती तुम्ही तुमच्यासाठी काय हे जाणवू देणार नाही. तसेच तो असावं काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. हे लक्षात ठेवा.' अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीने सोशल मीडियावर आणखी एक गोष्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या हृदयाची अवस्था संगिकतील आहे.

अभिनेता आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या लग्नाची बातमी व्हायरल झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी राजोशी बरुआने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. राजोशी यांनी दुसर्‍या पोस्टमध्ये लिहिले की, 'कदाचित अतिविचार आणि शंका तुमच्या मनातून निघून गेली आहेत. क्लियारीटीच्या जागी कंफ्युजन झाले आहे.

तुमचे जीवन शांती आणि संयमाने भरून जावो. तुम्ही बऱ्याच काळापासून खूप मजबूत राहिला आहात. आता तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे. कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात.'

आशिष विद्यार्थीची यांच्या पाहल्या पत्नीने तिच्या सोशल मीडिया केली पोस्ट डिलीट केली आहे. तिची पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे. आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी लग्न करत असल्याच्या बातमीनंतर, प्रत्येकाला अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

आशिष विद्यार्थी यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून 23 वर्षांचा मुलगा असून, त्याचे नाव विद्यार्थी आहे. आशिषची दुसरी पत्नी गुवाहाटीची आहे आणि कलकत्त्यात एक उच्च फॅशन स्टोरची मालकीण आहे.

ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी कोलकात्यातील एका क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नगाठ बांधली आहे. आशिष आणि रुपाली यांनी आसामी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत

आशिष विद्यार्थी यांची पहिल्या पत्नी राजोशी एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार आहेत. आशिषबद्दल सांगायचे तर, तो हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहे. तो तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये दिसला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com