Ashok Saraf: ‘सा रे ग म प’च्या छोट्या उस्तादांचे प्रेम पाहून अशोकमामा भारावले, फुलांची उधळण करत केला सन्मान, Video व्हायरल

Sa Re Ga Ma Pa Little Champs Latest Episode: ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्समधील छोट्या उस्तादांनी अशोक मामांना आपल्या खास अंदाजात अनोखी मानवंदना दिली.
Ashok Saraf In Sa Re Ga Ma Pa Little Champs Programme
Ashok Saraf In Sa Re Ga Ma Pa Little Champs ProgrammeSaam Tv

Ashok Saraf In Sa Re Ga Ma Pa Little Champs Programme

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकताच वयाची ७५ पूर्ण केली असून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करुन ५० वर्षे पूर्ण केले आहे. कायमच विनोदाचा अचुक टायमिंग साधत त्यांनी चाहत्यांचे निखळ मनोरंजन कायमच केले आहे. ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२३’मध्ये अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेते अशोक सराफ यांनी ‘झी मराठी’वरील ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्सच्या मंचावर येत्या एपिसोडमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी लिटिल चॅम्प्समधील छोट्या उस्तादांनी अशोक मामांना आपल्या खास अंदाजात अनोखी मानवंदना दिली.

Ashok Saraf In Sa Re Ga Ma Pa Little Champs Programme
Jawan 6th Day Collection: फक्त भारतातच नाही तर जगभरात 'जवान'ची हवा, ६०० कोटींपार कमाई करत मोडले सर्व रेकॉर्ड

अशोक मामांना अनोखी मानवंदना देत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी सर्व छोट्या उस्तादांनी ‘सा रे ग म प’च्या मंच्यावरून अशोक मामांना अनोखी मानवंदना दिली आहे. नुकतंच ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्सच्या येत्या एपिसोडमध्ये अशोक मामा हजेरी लावणार आहेत. लिटील चॅम्प्सने अशोक सराफ यांना सिंहासनावर बसवले. सिंहासनावर बसवून त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे पाय धुवून त्यांचा आशीर्वाद घेतला. लिटिल चॅम्प्सचं हे प्रेम पाहून अशोक मामा गहिवरले आहेत.

अशोक सराफ यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केले. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘साडे माडे तीन’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चमक दाखवली. (Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com