अशोक सराफ यांची 'ही' होती आवडती अभिनेत्री

अशोक सराफ कोणाकडून अभिनयाचे धडे शिकले? व त्यांची आवडती अभिनेत्री (actress) कोण होती? याचा खुलासा केला आहे.
ashok saraf
ashok sarafSaam tv

मुंबई : मराठी चित्रपसृष्टीत आपल्या दमदार आणि खोडकर अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकणार आभिनेता म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf). ४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. काही जुने कलाकार तर काही नविन नुकतेच चित्रपट सृष्टीमध्ये आलेले कलाकार. प्रत्येक कलाकार हा त्यांच्यासोबत अभिनय करताना अभिनयाचे अनेक धडे शिकत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? अशोक सराफ कोणाकडून अभिनयाचे धडे शिकले? व त्यांची आवडती अभिनेत्री (actress) कोण होती? याचा खुलासा केला आहे. ( Ashok Saraf News In Marathi )

हे देखील पाहा -

काही दिवसांपूर्वी अशोक सराफ कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमामध्ये आले होते. तेव्हा सकाळ या वृत्तपत्राशी संवाद साधताना ते म्हणाले ' मी बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. पण त्यात कोणी जर टॅलेंटेड आणि जिद्दी असेल तर ती म्हणजे रंजना देखमुख . पुढे अशोक सराफ सांगतात ,'काही कलाकार असे असतात ज्यांना एखादी गोष्ट जमत नसेल, तर ते त्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यातलीच एक होती रंजना. एखादं कठीण काम समोरं आल की ते काम पूर्ण करायची जिद्द तिच्यात होती'. ती अतिशय मेहेनती अभिनेत्री होती. विनोद हा तिचा बाज नसूनही ती ते शिकली व विनोदी अभिनेत्री म्हणूनही तिने नाव कमावलं.

ashok saraf
IIFA 2022 : अभिनेत्री सई ताम्हणकर ठरली IIFA पुरस्काराची मानकरी

कोण होत्या रंजना देखमुख ?

रंजना देशमुख यांनी 'हरिश्चंद्र तारामती' या चित्रपटातून वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ' लडकी सह्याद्री कि' या हिंदी चित्रपटात देखील काम केलं. त्यानंतर तरुण वयात त्यांनी 'नवरा नको ग बाई' या चित्रपटात मुख्य भूमिका केली. तसेच त्यांना 'अरे संसार संसार' या चित्रपटासाठी महारष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देखील मिळाला होता. परंतु नंतर १९९३ साली वी. शांताराम यांच्या झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बँगलोरला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी त्यांच्या बरोबर इतर सहकलाकार सुद्धा होते. या अपघातात बाकी कोणाला काही विशेष इजा झाली नाही पण रंजना यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले. त्यामुळे त्यांनी आपल्या कामापासून कायमची निवृत्ती घेतली.

अशोक सराफ आणि मंगला देशमुख यांनी एकत्र केलेले चित्रपट...

अशोक सराफ आणि रंजना देशमुख या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंद केलं होतं. या दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले बिन कामाचा नवरा , गोंधळात गोंधळ, एक डाव भूताचा, सुशीला, खिचड हे त्याचे त्या काळातील चित्रपट खूप गाजले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com