Sunny Deol Chup : पत्रकार परिषदेत पत्रकार प्रश्न विचारत होता, अचानक रागाने ओरडला सनी देओल!

एका पत्रकार परिषदेत सनी देओलने असे काही केले की ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी काही सेकंदांसाठी घाबरले होते.
Sunny Deol
Sunny DeolSaam TV

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल(Sunny Deol) सुपरस्टार अभिनेत्यांन पैकी एक आहे यात काही शंका नाही. आता पुन्हा एकदा सनी मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. त्याचा 'चूप'(Chup) हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. ज्यामध्ये सनी व्यतिरिक्त दुल्कर सलमान, पूजा भट्ट आणि श्रेया धन्वंतरी दिसणार आहेत. २३ सप्टेंबरला म्हणजे उद्या 'चूप' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाची स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यग्र आहे, मात्र एका पत्रकार परिषदेत सनी देओलने असे काही केले की ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी काही सेकंदांसाठी घाबरले होते.

Sunny Deol
5D Movie : 'ब्रह्मास्त्र' आणि 'अवतार २' चा रेकॉर्ड मोडणार 'हा' बॉलिवूड चित्रपट; रणवीर अक्षय आणि अजय देवगण दिसणार मुख्य भूमिकेत

त्याचं झालं असं की, 'चूप'च्या कलाकारांसोबत पत्रकार परिषद सुरू होत्या. उपस्थित पत्रकार प्रश्न विचारत होते की अचानक हातात माईक धरून बसलेला सनी देओल रागाने ओरडला आणि त्याने जोरजोरात ओरडून सगळ्यांना गप्प केले. अचानक सनीचा जोरात किंचाळ ऐकून सर्वजण दंग झाले आणि काय झाले ते क्षणभरही कोणालाच समजले नाही, पण दुसऱ्याच क्षणी सनी हसायला लागला आणि सगळ्यांना समजले की हा त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक मार्ग आहे.

सनी देओल बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये त्याचा 'मोहल्ला अस्सी' हा चित्रपट रिलीज झाला होता. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकली नाही, पण या चित्रपटातील सनीच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली. यापूर्वी २०१८ मध्ये तो भाऊ बॉबी देओल आणि वडील धर्मेंद्र यांच्यासोबत 'यमला पगला दिवाना फिर'मध्ये दिसला होता. २०१९ मध्ये, त्यांनी 'पल-पल दिल के पास' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले ज्यामध्ये त्याचा मुलगा करण देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या सनी त्याच्या 'चूप' या चित्रपटामुलळे चर्चेत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com