Viral Video: पठानचीच हवा! तो सीन सुरू झाला अन्...; शेकडो प्रेक्षक पळाले...; व्हिडिओ व्हायरल

पठान चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवसांपासून तिकीट बारीवर चाहत्यांची गर्दी उफाळून आली आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video: गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पठान चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू झाला आहे. ४ वर्षांनंतर शाहरुखचा दमदार कमबॅक चाहत्यांना भावला आहे. पठान चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवसांपासून तिकीट बारीवर चाहत्यांची गर्दी उफाळून आली आहे. अशात आता याच चित्रपटाच्या एका शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. (Latest Viral Video News)

दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान अभिनीत पठाण चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. अशात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर 'झुमे जो पठान' या गाण्यावर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला आहे. चित्रपट सुरू झाल्यावर स्क्रिनवर हे गाणं वाजू लागल्यावर आख्ख थेअटर दणाणून गेलं आहे. प्रेक्षक स्क्रिन जवळ जाऊन नाचू लागले आहेत. या एका व्हिडिओमध्येच प्रेक्षकांमध्ये पठान चित्रपटाचं किती क्रेज आहे हे समजतं.

शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखलं जातं. गेल्या तीन ते चार वर्षांचा काळ त्याच्यासाठी कठीण गेला. आर्यन खानचे नाव अंमली पदार्थांप्रकरणी समोर आल्यावर मोठ्या अडचणींचा त्याला सामना करावा लागला. अशात बहुप्रतीक्षित पठान चित्रपट देखील प्रदर्शित होण्याआधी मोठ्या प्रमाणावर वादात सापडला होता.

Viral Video
Bollywood Celebrity In Pathaan Review: चाहत्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींनाही शाहरुखच्या 'पठान'ची भुरळ...

काल इंदौरमध्ये काही समाजकंठकांकडून चित्रपटगृहात शो बंद करण्यात आला. मात्र जमाव पांगल्यावर चित्रपट गृहाच्या मालकाने पुन्हा एकदा चित्रपट दाखवला. शाहरुख आणि दीपिकावर एकीकडे जोरदार टीका होत आहे. मात्र दुसरीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सूकता देखील शिगेला पोहचत चालली आहे.

बाहुबली, केजीएफ २ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली. अशात आता पठान देखील मोठ मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडून ठेवेल असे दिसत आहे. 'झुमे जो पठान' या गाण्यावर चित्रपट गृहाच्या स्क्रिनसमोर प्रेक्षकांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे. व्हिडिओ पाहून हा चित्रपट केजीएफला टक्कर देणार असं नेटकरी म्हणत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com