Avatar: The Way of Water
Avatar: The Way of WaterSaam Tv

Avatar The Way Of Water: हिंदू देव-देवतांच्या प्रेरणेतून कॅमरूनचा 'अवतार', दुसरा भाग येतोय

सोशल मीडियावर अवतार चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु झाली आहे. येत्या महिन्यात हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे.

Avatar The Way Of Water: प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनच्या चित्रपटांविषयी चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्याच्या टायटॅनिक चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. त्याच्या पुरस्कारांच्या यादीत ऑस्कर पुरस्कार जिंकण्याचा आगळा वेगळा विक्रम कोरला आहे. सध्या या दिग्दर्शकाचा अवतार द वे ऑफ वॉटर चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

Avatar: The Way of Water
TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत 'या' लोकप्रिय पात्राची होणार एन्ट्री?

सोशल मीडियावर अवतार चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु झाली आहे. येत्या महिन्यात हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे. त्याची सर्वच चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीही व्हायरल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कॅमेरुन आणि त्याच्या टीमने आपल्याला या चित्रपटाची प्रेरणा हिंदू संस्कृतीतून मिळाल्याचे सांगितले. अवतारमध्ये पुनर्जन्म दाखवण्यात आला आहे. ती गोष्ट हिंदू धर्मातून आल्याचे निर्मात्यांचे मत आहे. कॅमेरुनने मुलाखतीतून यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

Avatar: The Way of Water
The Kashmir Files: नदाव लॅपिड यांचे इफ्फीतील वादावर मौन सोडले, सांगितले खरं कारण

कॅमेरुन म्हणतो की, हिंदू धर्मात आपल्याला खूप शिकण्यासारख्या बाबी आहेत. माझ्या अनेक चित्रपटांतील कित्येक गोष्टींचा संदर्भ हिंदू धर्म आणि देवदेवतांशी संबंधित आहेत. हिंदू धर्मातल्या पौराणिक कथेंमधून मी अवतार साकारला आहे. ६८ वर्षीय आणि मुळ कॅनडा येथे राहणाऱ्या कॅमेरुनच्या अवतारच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. जगभर या चित्रपटाने आर्थिक घोडदौड कायम ठेवली होती. चित्रपटाचा पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता.

Avatar: The Way of Water
Shehnaaz- MC Square: शहनाज- एमसी स्क्वेअर एकाच फ्रेममध्ये, पोस्टरपाहून चाहते उत्सुक

चित्रपटाचा पुढील भाग अर्थात दुसरा भा तब्बल १३ वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बऱ्याच वर्षांपासून अवतारच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे प्री-बुकींग मोठ्या प्रमाणात झाले आहेत. अवतार द वे ऑफ वॉटरचा पहिला भाग प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

या चित्रपटाकडे जगातील सर्व चित्रपटप्रेमी एक महागडा चित्रपट आणि खर्चिक चित्रपट म्हणून नाव उच्चारले आहे. चित्रपटातील ग्राफिक्स हे कमालीचे आहे. एका काल्पनिक विश्वातील हे कथानक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com