Avatar: The Way of Water new trailer: 'अवतार'च्या नव्या ट्रेलरने चाहत्यांना पडली भुरळ, पाण्यातील जादू पाहण्यासाठी चाहते उत्सुक

'अवतार: द वे ऑफ वॉटर' 16 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.
Avatar: The Way of Water New Trailer
Avatar: The Way of Water New Trailer Saam Tv

Avatar: The Way of Water Update: दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांच्या विज्ञान कथेवर आधारित चित्रपट अवतार: द वे ऑफ वॉटरचा शेवटचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या मागील प्रोमोमध्ये देखील अनोख्या जगाची सुंदर झलक आपल्याला पाहायला मिळाली होती. कॅमेरॉनने एक दशक परिश्रम करून हा चित्रपट तयार केला आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर' 16 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. तसेच चित्रपटाची तिकिटे आतापसूनच विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

दोन मिनिटांचा या ट्रेलरमध्ये जेक सुली आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनाची सखोल माहिती मिळते. जेक त्यांना नवीन आणि न दिसणार्‍या धोक्यांपासून संरक्षण देण्याची शपथ घेतो. नवीन ट्रेलरमध्ये पँडोरा आणि पाण्याखालील जीवनाचे आश्चर्यकारक व्हिज्युअल दाखविण्यात आले आहेत. कॅमेरून यांनी पाण्याखाली मोशन कॅप्चर करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात अनेक वर्षे घालवली.

Avatar: The Way of Water New Trailer
Bhediya Movie Promotion: वरुण धवनच्या 'या' सवयीने क्रिती आहे त्रस्त, म्हणाली 'खूप चंचल...'

अवतार: द वे ऑफ वॉटर अवतार 10 वर्षांनी तयार झाला आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेला अवतार आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्यात मानवी आक्रमणकर्त्यांच्या एका गटाची कथा सांगण्यात आली होती. हा गट परकीय भूमीवर संसाधने लुटण्याच्या मोहिमेसह गेले होते. (Movie)

जेम्स कॅमेरॉनने फ्रँचायझीमधील हा दुसरा चित्रपट नुकताच पूर्ण झाला असून त्याने तिसरा चित्रपटही शूट केला आहे. मात्र, अवतार 2 आणि अवतार 3 यशस्वी झाल्यानंतरच तो चौथ्या आणि पाचव्या चित्रपटांवर काम सुरू करणार आहे. फ्रँचायझीबद्दल बोलताना कॅमेरॉन सिनेमाकॉन म्हणाले, “पहिल्या अवतारसह, आम्ही मोठ्या पडद्याच्या मर्यादा ओलांडण्यासाठी तयार आहोत. नवीन अवतार चित्रपटांसह, आम्ही 3D सह, उच्च डायनॅमिक श्रेणी, उच्च फ्रेम दर्जा, उच्च रिझोल्यूशन आणि आमच्या व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये बऱ्याच मर्यादा ओलांडून पुढे गेलो आहोत. (Hollywood)

अवतार: द वे ऑफ वॉटर भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होईल. या सीक्वलमध्ये सॅम वर्थिंग्टन, झो साल्डाना, सिगॉर्नी वीव्हर, स्टीफन लँग, क्लिफ कर्टिस, जोएल डेव्हिड मूर, सीसीएच पाउंडर, एडी फाल्को, जेमेन क्लेमेंट आणि केट विन्सलेट आहेत. (India)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com