Sambhavna Seth: IVF उपचारानंतरही भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठला मातृत्व नाहीच; पतीनं सांगितलं मनातलं दुःख

संभावना सेठला गर्भधारणेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Sambhavna Seth
Sambhavna SethSaam Tv

मुंबई - भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavna Seth)आई होण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. संभावनाने आई होण्यासाठी आयव्हीएफचाही (IVF) सहारा घेतला आहे, पण ती अजूनही आई होऊ शकलेली नाही. लेखक आणि अभिनेता अविनाश द्विवेदीची पत्नी, संभावना गेल्या बऱ्याच काळापासून आई होण्यासाठी आयव्हीएफ मार्गाचा अवलंब करत आहेत. पण, तरीही तिला गर्भधारणेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अविनाशनं एका मुलाखतीत त्याची पत्नी नेमकी कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहे याची माहिती दिली आहे. 2016 मध्ये लग्न झालं त्यावेळी आम्ही मुलाचा फार विचार केला नव्हता कारण आम्ही स्वत: त्यावेळी तयार नव्हतो.त्यावेळी आमच्यावर कुटुंबाचाही दबाव होता. पण, हा निर्णय आम्हा दोघांचा असेल हे आम्ही ठरवलं होतं असं अविनाशनं सांगितलं.

बाळासाठी ही दोघंही तयार असताना संभावनाला गर्भधारणेत अनेक अडचणी येऊ लागल्या आणि त्यानंतर यासाठी त्यांनी IVF चाही अवलंब केला. IVF या अतिशय वेदनादायी अशा या प्रक्रियेच्या वेदना तेव्हा अधिक जाणवल्या जेव्हा या जोडीनं अपयशाचा सामना केला.

अविनाश पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही दोघेही बाळाच्या नियोजनासाठी पूर्णपणे तयार होतो, तेव्हा गर्भधारणा करण्यात अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत आम्ही आयव्हीएफचाही अवलंब केला. आयव्हीएफ एक अतिशय वेदनादायक प्रक्रिया आहे. या उपचाराने अनेक जोडप्यांना मदत केली आहे. परंतु मी संभावनाला जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तिचं मन तिळतिळ तुटताना मला दिसत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शारीरिक आणि मानसिक आधाराची खूप गरज असते', असंही तो म्हणाला.

Sambhavna Seth
धान्य व्यापा-यास जिवे मारण्याची धमकी; एमआयडीसीतून दाेन तासांत एकास अटक

खुद्द संभावना या प्रक्रियेबद्दल सजग असून, तिच्या शरीरात यामुळं असंख्य बदल होत आहेत, ज्यामुळं तिचं रोजचं जगणंही आव्हानात्मक झालं आहे. दर महिन्याला आयव्हीएफ आणि त्यानंतरचं अपयश हे सारं झेलूनही संभावना खंबीरपणे उभी आहे, हे म्हणताना त्यांची हतबलता स्पष्ट दिसून आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com