Ayushmann-Aparshakti Spotted With Mother : आयुष्मान - अपारशक्तीचा आईसोबतच इमोशनल व्हिडिओ व्हायरल ; वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाले संपूर्ण कुटुंब

Ayushmann-Aparshakti Viral Video: आई पुनम हिचा हात हातात घेऊन आयुष्यमान आणि अपारशक्ती एअरपोर्टवर दिसले.
Ayushmann-Aparshakti With Their Mother
Ayushmann-Aparshakti With Their MotherSaam TV

Ayushmann-Aparshakti With Their Mother : आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना बॉलिवूडमधील प्रसिद्द भावंडे आहेत. त्यांचे वडिल पंडित खुराना यांचे १९मे रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते चंदिगड येथे त्यांच्या मुळ गावी गेले होते. चंदिगढवरुन मुंबईला परतले आहेत. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघे भाऊ त्यांची आई पुनमसोबत मुंबई विमानतळावर दिसले.

वडिला्च्या निधनानंतर काही आठवड्यानंतर खुराना ब्रदर्स काल मुंबईत आले आहेत. यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आयुष्यमान आणि अपारशक्ती त्यांच्या आईचा हात हातात घेऊन येताना दिसले. दोघेही त्यांच्या आईला धीर देत चालत होते. (Latest Entertainment News)

Ayushmann-Aparshakti With Their Mother
HBD Neha Kakkar : भजनं गाणाऱ्या नेहा कक्करची कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री ?

आयुष्मान आणि अपारशक्ती आईसोबत मुंबईत परतले

आयुष्मान आणि अपारशक्ती नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. आयुष्मान अभिनेता तर आहेच त्यासह तो एक गायकही आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

पंडित खुराना हे एक ज्योतिषी होते. त्यांच्या मुलांच्या कारकिर्दीच त्यांना नेहमीच कौतुक असायचं. वडिलांचे अंत्यसंस्कार करुन काल संपूर्ण कुटुंब मुंबईला परतले. यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यांची आई पुनम हिचा हात हातात घेऊन आयुष्यमान आणि अपारशक्ती एअरपोर्टवर दिसले.

आयुष्मानने त्याची आई आणि अपारशक्तीसोबतचा एक सेल्फी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. हा सेल्फी विमानात काढलेला आहे. त्यांच्या या सेल्फीवरही चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केले आहे. त्यांच्या कुटुंबाला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी शक्ती मिळावी ही प्रार्थना करणाऱ्या अनेक कमेंट नेटकरी करत आहेत. (Celebrity)

आयुष्मानची वडिलांसाठी खास पोस्ट

आयुषामानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होती. त्यात आयुष्मान, अपारशक्ती आणि त्यांची आई पुनम हे त्यांच्या वडिलांच्या फोटो समोर उभे असल्याचे दिसत आहे.

आयुष्यमान अजुनही काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात संपूर्ण कुटुंब त्यांच्या वडिलांच्या फोटोचं दर्शन घेताना दिसत आहे. तर वडिलांना आवडणाऱ्या मिठाईचा फोटो देखील आयुष्यमानने शेअर केला आहे. त्यावर लिहल आहे की, मी अशी इच्छा व्यक्त करतो की तुम्हाला हे आवडेल. त्याचबरोबर त्याने त्यांच्या वडिलांचा फोटोही शेअर केला आहे.

आयुष्यमान पोस्टमध्ये लिहले आहे की, आईची काळजी घ्यायची आहे, नेहमी तिच्यासोबत राहायच आहे, वडिलांसारख बनण्यासाठी खूप वेळ लागेल. पहिल्यांदाच असं वाटतयं की पापा तुम्ही खुप लांब आहात पण तरीही खुप जवळही आहात. धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी, मायेसाठी अणि आठवणींसाठी. जय जय. अशी भावूक पोस्ट शेअर केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com