Pathan Breaks Record: 'बाहुबली'च्या निर्मात्यांनी 'पठान'च्या यशाचे गायले गोडवे; म्हणाले 'मला आनंद नाही पण...'

'पठान' चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.
Bahubali Producer Tweet
Bahubali Producer Tweet Saam Tv

Pathan Breaks Record Of Bahubali: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांना पुन्हा हाऊसफुलचे स्वप्न दाखवले आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने विक्रमी कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 'पठान' चित्रपटाने 'बाहुबली २' या चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडला आहे. तसेच हा रेकॉर्ड मोडून 'पठान' चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

शाहरुख खानने 'पठान' चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्याच्या या कमबॅक चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. वयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला मिळालेले हे यश अभूतपूर्व आहे जयची कोणी कप्लनाच केली नसेल. शाहरुखचा देखील त्याच्या करियरमधील हा सर्वाधिक यशस्वी ठरलेला चित्रपट ठरला आहे. 'पठान'च्या या यशावर बाहुबली चित्रपटाचे निर्माते शोबू यरलागड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bahubali Producer Tweet
AP Dhillon In WPL 2023: एपी ढिल्लों लाईव्ह परफॉर्न्समध्ये पडला ढिल्ला, चाहते-नेटकरी निराश

निर्माते शोबू यरलागड्डा यांच्या 'बाहुबली 2' चित्रपटाचा विक्रम मोडल्यानंतर त्यांनी ट्विट केले आहे की, “बाहुबली 2 चे हिंदी नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन क्रॉस केल्याबद्दल शाहरुख सर, सिद्धार्थ आनंद, YRF आणि 'पठान'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. रेकॉर्ड फक्त तोडण्यासाठीच बनवले जातात आणि मला आनंद आहे की हा रेकॉर्ड दुसऱ्या कोणीही नाही तर शाहरुख खानने मोडला आहे.

शोबूच्या या ट्विटला यशराज फिल्म्सने देखील उत्तर दिले आहे. यशराज फिल्म्सने ट्विट करत लिहिले की, “भारतीय सिनेमा कसा भरभराटीला येत आहे हे पाहण्यापेक्षा आनंददायी काहीही नाही. एसएस राजामौली दिग्दर्शित बाहुबली सारखा ऐतिहासिक चित्रपट दिल्याबद्दल शोबूचे आभार. त्यातून आम्हाला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली.

प्रभासच्या 'बाहुबली 2'ला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तसेच जगभरात खूप यश मिळाले. हिंदीमध्ये, चित्रपटाने सुमारे 511 कोटींची कमाई केली, 'पठान'ने प्रदर्शित झाल्यानंतर 37 दिवसांत हा रेकॉर्ड मोडला. तसेच सर्वाधिक कमाई करणार्‍या हिंदी चित्रपटात प्रथम क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले.

'पठान'मध्ये शाहरुखच्या बरोबर दीपिका पदुकोण आहे. तर जॉन अब्राहमने खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर सलमान खानदेखील एका छोट्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट अॅक्शनने परिपूर्ण आहे.

हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'पठान'ने एकीकडे पहिला क्रमांक पटकावला आहे, तर बाहुबली 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर यशचा चित्रपट KGF 2 तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि आमिर खानचा दंगल चौथ्या क्रमांकावर आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com