Pathan Controversy : पठान चित्रपटाचं भलंमोठं पोस्टर उतरवलं; पुण्यात बजरंग दल आक्रमक

पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेरील पोस्टर्स बजरंग दलाकडून काढण्यात आले आहेत.
Pathaan
Pathaan Saam Tv

Bajrang Dal Created Controversy on Pathan: शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'पठान' २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करण्यात येत आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून अनेक वाद झाले. देशभरात या चित्रपटावरून अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. दोन दिवसांनी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. असे असताना पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे.

Pathaan
KL Rahul-Athiya Wedding: के.एल.राहुल-अथिया यांच्या लग्नविधींना सुरूवात, व्हिडिओ झाला व्हायरल...

'पठान' चित्रपटावरून पुण्यात बजरंग दल आक्रमक झाले आहे. पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेरील पोस्टर्स बजरंग दलाकडून काढण्यात आले आहेत. शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आहे. 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून या वादाला सुरूवात झाली आहे. या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून हा वाद पेटला होता. दीपिकाच्या या कापड्यांवरून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आहेत अनेक संघटनांचे म्हणणे होते.

काल शिवाजीनगर येथील राहुल चित्रपटगृहाबाहेरील 'पठान' चित्रपटाचे पोस्टर बजरंग दलाने पोस्टर्स उतरवले आहेत. शाहरुख खानच्या काही फॅन्सनी चित्रपटगृहाबाहेर एक भलंमोठं पोस्टर लावण्यात आलं होतं. यानंतर बजरंग दलाकडून राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली गेली.

'पठान' चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध होत असला तरी प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची २ लाखाहून अधिक तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. शाहरुखचे चाहते आणि प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. दीपिका या चित्रपटामध्ये अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. तर जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com