Beed : 'रानबाजार' वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात; पोलिसांत तक्रार दाखल

रानबाजार वेबसीरिज वादात अडकली आहे. रानबाजार (Raanbaazaar) या वेबसीरिज विरोधात पोलीस बॉय संघटनेने पोलीस खात्याची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.
Raanbaazaar News
Raanbaazaar News saam tv

बीड : 'रानबाजार' ही मराठी वेबसीरिज प्रंचड गाजली. या वेबसीरिज प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. रानबाजार या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. रानबाजार ही वेबसीरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकळ्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मात्र, सध्या ही वेबसीरिज वादात अडकली आहे. रानबाजार (Raanbaazaar) या वेबसीरिज विरोधात पोलीस बॉय संघटनेने पोलीस खात्याची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. या संघटनेने वेबसीरिज विरोधात आक्रमक भूमिका घेत लेखक-दिग्दर्शक कलाकारांवर कारवाईची मागणी केली आहे. ( Raanbaazaar web series News In Marathi )

Raanbaazaar News
Koffee With Karan 7 : कपूर कुटुंबाविषयी आलिया भट्ट पहिल्यांदाच स्पष्ट बोलली, म्हणाली...

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रचंड गाजणारी 'रानबाजार' ही पहिली वेबसीरिज ठरली. मात्र, या 'रानबाजार' वेबसीरिजमधून पोलीस (Police) खात्याची बदनामी केल्याचा आरोप विरोधात पोलिस बॉईज संघटनेने केला आहे. या वेबसीरिज विरोधात पोलिस बॉईज संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संघटनेने बाजार वेबसीरिजच्या लेखक, दिग्दर्शक, आणि कलाकारांवर कारवाई करावी करण्याची मागणी केली आहे. पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दूबाले यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेने बीडच्या (Beed) शिवाजी नगर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. सदर वेबसीरिजवर कारवाई न झाली नाही, तर पुढे काय होईल हे तुम्ही पाहाल, असा इशारा पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिला आहे.

Raanbaazaar News
Ponniyin Selvan : ऐश्वर्या रायचा 'राणी नंदिनी'चा पहिला लूक बघाच, जणू अप्सराच

दरम्यान, रानबाजार वेबसीरिजवर प्रेक्षकांकडून चांगली पंसती मिळाली. रानबाजारच्या निमित्ताने मराठीमध्ये नवा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरला. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्वीनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग,अभिजीत पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर , श्रेयस राजे, अतुळ काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठीने केली असून अभिजीत पानसे यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com