
Khatron Ke Khiladi In Shiv Thakare: ‘बिग बॉस 16’ फेम शिव ठाकरे नेहमीच चर्चेत असतो. कधी आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रेमामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ हा रिॲलिटी शोची ट्रॉफी त्याला मिळू शकली नाही, पण त्याने त्याच्या साफ मनामुळे चाहत्यांची मने मात्र जिंकली. ‘बिग बॉस 16’ नंतर लवकरच आणखी एका रिॲलिटी शोचा हिस्सा होणार आहे. शिव ठाकरे रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ 13 च्या माध्यमातून पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परत येणार आहे.
या शोमध्ये शिव अनेक महत्वाचे टप्पे पार करत, कठीण शर्यती पार करत स्वत:ला सिद्ध करताना दिसणार आहे. या शोच्या माध्यमातून कधी तो उंचावरून लटकताना दिसेल तर कधी साप आणि मगरी यांच्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसणार आहे. हे कठीण स्टंट पेलण्यासाठी शिव खुप उत्साहित देखील असून तो या शोसाठी पुर्णपणे तयार आहे. त्याने यासाठी खुप मेहनत देखील घेतली असल्याच त्याने सांगतिले आहे. त्याने यापुर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि आशीर्वाद देखील घेतले.
आता शिव ‘खतरों के खिलाडी’ 13 साठी सज्ज झाला असुन त्याचा प्रवास देखील सुरु झाला आहे. मात्र त्यापुर्वी त्याच्या आईचा आणि त्याचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात शिवची आई त्याचे औक्षण करत असून शिव आता आईचा आशीर्वाद घेवुन ‘खतरों के खिलाडी’चा 13 वा सिझन गाजवण्यासाठी निघाला आहे. त्याच्या चाहत्यांना तर पुर्णपणे विश्वास आहे की शिव हा शो नक्कीच जिंकणार आहे. तो आता शूटिंगसाठी सध्या रवाना होणार असून चाहते सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
शिवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, शिव यापूर्वी एमटीव्ही रोडिज, बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या सीझनचा उपविजेता झाला होता. ‘बिग बॉस 16’ नंतर त्याच्याकडे आगामी चित्रपटांची भली मोठी यादी आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.