टीव्ही इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का; 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याचे निधन

मनोरंजनसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Deepesh Bhan passes away
Deepesh Bhan passes awaySaam Tv

मुंबई - टीव्ही इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाभी जी घर पर है फेम अभिनेता दिपेश भान (Deepesh Bhan) यांचे निधन झाले आहे. शोमध्ये दीपेश मलखान सिंगच्या भूमिकेत दिसला होता. दिपेश त्याच्या कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. दीपेश भानच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी तो क्रिकेट खेळत असताना अचानक खाली पडला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी दीपेशला मृत घोषित केले. त्याच्या मागे बायको आणि मुलगा आहे 2019 मध्ये दिल्ली येथे त्याचं लग्न झालं होतं.

Deepesh Bhan passes away
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चे बजेट 500 कोटी, निर्मात्यांनी सांगितली रिलीजची तारीख

11 मे 1981 रोजी जन्मलेल्या दीपेशने वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी हे जग सोडले. दिपेशने दिल्लीतून पदवी घेतल्यानंतर थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथून अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2005 मध्ये दीपेश मुंबईत आला. शोमध्ये मुलींसोबत फ्लर्ट करणाऱ्या दीपेश भानचे खरे लग्न मे 2019 मध्ये दिल्लीत झाले होते. गेल्या वर्षी 14 जानेवारी 2021 रोजी दिपेश मुलाचा पिता झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com