Shubhangi Atre: अंगुरी भाभीचा तब्बल १९ वर्षांचा संसार मोडला, 'या'कारणामुळे घेतला घटस्फोट...

भाभीजी घर पर हैं फेम अंगूरी भाभी उर्फ ​​अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली आहे.
Shubhangi Atre Divorced
Shubhangi Atre DivorcedSaam Tv

Shubhangi Atre Divorced: भाभीजी घर पर हैं फेम अंगूरी भाभी उर्फ ​​अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली आहे. गेल्या १९ वर्षांपुर्वी तिने पती पियुष पुरीसोबत लग्नगाठ बांधली होती. पण नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार, तिने पियुष सोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘अंगुरी भाभी’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने नुकतीच तिचा घटस्फोट झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. १९ वर्षांच्या संसारानंतर शुभांगी अत्रे हिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Shubhangi Atre Divorced
Deepika Padukone: दीपिकाची ऑस्करसाठी परदेशवारी, खास आऊटफिटने वेधलं साऱ्यांचंच लक्ष...

गेल्या काही दिवसांपासून ते एकत्रही राहत नव्हते. सोबतच आता पुन्हा एकदा ते एकत्र येणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये होत होती, पण आता असं होण्याची शक्यता कमी वाटत आहे. शुभांगी आणि पियुष यांना एक मुलगीही आहे. दोघांनी 2003 मध्ये लग्नगाठ बांधली होती. शुभांगीचा पती पियूष डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करत असून त्या दोघांनीही इंदूरमध्ये लग्नगाठ बांधली होती.

यापूर्वी शुभांगी अनेकदा पतीचे कौतुक करताना दिसली होती. पतीने नेहमीच आपल्याला पाठिंबा दिला असून आपली कारकीर्द घडवण्यात मदत केली, असे शुभांगी म्हणाली होती. मात्र, आता दोघांच्या नात्यात दुरावा आला असून, दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शुभांगी एका मुलाखतीत म्हणाली होती, तिने तिचे लग्न वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरीही त्यांच्यातील मतभेद दूर होऊ शकले नाहीत.

Shubhangi Atre Divorced
Bharti Singh: प्राण्यांच्या उपमा द्यायचे..., बॉडी शेमिंगमुळे ट्रोल झालेली भारती अखेर बोलली

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगी म्हणाली, ‘जवळपास एक वर्ष झाले, आम्ही एकत्र राहत नाही. मी आमचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न फार केला होता, पण आमच्या नात्यातील आदर, एकमेकांमधीस विश्वास, सहवास सोबतच मैत्री प्रत्येकाला मिळणं फार महत्वाचे आहे. काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळे, आम्ही एकमेकांना वेळ देण्याचे ठरवले आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे.’

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com