Attack On Actor: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर फॅनचा हल्ला; VIDEO व्हायरल

Fan Misbehave: 'भाग्य लक्ष्मी'मधील अभिनेता आकाश चौधरीसोबत एक दुर्घटना घडली आहे.
Bhagya Lakshmi Fame Actor Akash Choudhari Gets Attack
Bhagya Lakshmi Fame Actor Akash Choudhari Gets Attack Saam TV

Actor Akash Choudhary Get Attract:

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका 'भाग्य लक्ष्मी'मधील अभिनेता आकाश चौधरीसोबत एक दुर्घटना घडली आहे. शनिवारी अभिनेत्यासोबत फॅनने गैरवर्तन केले आहे. फॅनच्या या वाईट कृत्यामुळे आकाश संतापला. आकाश चौधरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश चौधरी चाहत्यांसोबत फोटो क्लिक करत होता. फोटो क्लिक करून झाल्यावर तो जाण्यासाठी निघाला. दरम्यान काही फॅन फोटोसाठी त्याच्या मागे गेले. आकाश चौधरी फोटो न देता गेल्याने फॅन चिडला आणि आकाशाला पाण्याची बॉटल फेकून मारली.

Bhagya Lakshmi Fame Actor Akash Choudhari Gets Attack
Shah Rukh Khan On Dunki: 'मेरी फिल्म आती है तब...' 'जवान'च्या पार्टीत शाहरूख खानने सांगितली 'डंकी'ची रिलीज डेट

फॅनच्या कृत्याने आकाश चौधरीला कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु त्याला खूप राग आला. आकाशने सर्वांसमोर त्या फॅनला सुनावले. आकाश चौधरीवर व्हिडीओमधील मुलाने दोन-तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आकाशने त्या मुलाला समज दिली. शेवटी त्या मुलाने आकाश चौधरीवर हल्ला केला. (Latest Entertainment News)

कलाकारांसोबत अशी घटना पहिल्यांदाच घडत नसून याआधी देखील कलाकारांवर हल्ले झाले आहेत. एका इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राचा पती निक जोनासवर काहीतरी फेकले होते. तर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत देखील असाच प्रकार घडला. सिक्युरिटी मोडत एक चाहता तमन्नाच्या अंगावर धावून आला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com