'भारत माझा देश आहे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला; प्रेक्षकांनी उधळली स्तुतीसुमने

Bharat Maza Desh Ahe : डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी केली एका देशभक्तीपर मराठी चित्रपटाची निर्मिती
'भारत माझा देश आहे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला; प्रेक्षकांनी उधळली स्तुतीसुमने
Bharat Maza Desh Ahe Movie special show newsSaam Tv

नंदुरबार : मशिदीवरचा भोंगा, हनुमान चालीसा (Hanuman Chalisa ) यावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे देशात वातावरण दुषित झाले आहे. मात्र, दुसरीकडे नंदुरबारमध्ये देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन पाहायला मिळत आहे. यामुळे लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जिवंत असल्याचे दिसून येत आहे. याच नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी गावचे सुपुत्र असलेल्या डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी एका देशभक्तीपर मराठी चित्रपटाची (Marathi Movie) निर्मिती केली आहे. या चित्रपटाची निर्मिती करून अग्रवाल यांनी देशातील लोकांना ऐक्याचा संदेश दिला आहे. नंदुरबार, कोल्हापूर आणि पुणे येथील बालकलाकारांच्या अभियातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Bharat Maza Desh Ahe Movie special show news )

हे देखील पाहा -

'भारत माझा देश आहे' असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. देशसेवेसाठी समर्पित सैनिकांच्या गावातील एक परिवारावर हा देशभक्तीपर चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. डॉ. आशिष अग्रवाल यांच्या द्वारा निर्मित या चित्रपटाचे स्पेशल शो नंदुरबारमध्ये (Nandurbar) आयोजन करण्यात आले होते. या चित्रपटाच्या शोसाठी चित्रपटातील बालकलाकारांसह अनेकांनी या स्पेशल शोला हजेरी लावली. नंदुरबारबारच्या मिराज सिनेमामध्ये या स्पेशल शोचे आयोजन केले होते. हा स्पेशल शो पाहिल्यानंतर अनेकांनी चित्रपटाचे (Movie) तोंडभरून कौतुक केले.

Bharat Maza Desh Ahe Movie special show news
सोनाक्षी सिन्हाने उरकला साखरपुडा? चाहत्यांना दिली खुशखबर, पण...

प्रेक्षकांकडून बालकलाकारांचे कौतुक

देशभक्तीपर चित्रपटात नंदुबार, कोल्हापूर आणि पुण्यातील बालकलाकारांनी या सिनेमात भूमिका केल्या आहेत. तसेच या चित्रपटात कोल्हापूरच्या राजवीर सिंह राजे(rajvir singh raje) आणि पुण्याच्या परी सावंत (Pari Sawant) हिने महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. दोन्ही बालकलाकारांनी मेहनीच्या जौरावर उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन केले आहे. दोघांनी चित्रपटात केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच प्रेक्षकांनी चित्रपटातील बालकलाकारांचेही (child artist) कौतुक केले.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.