Marathi Movie: धक्कादायक... थिएटर मालकांना वरून प्रेशर असल्याने 'TDM' चित्रपटाला शो दिले नाही... मराठी सिनेमाची निव्वळ गळचेपी

TDM Film Director: ‘टीडीएम’ चित्रपटाची चर्चा सर्वत्र जोमात सुरू असली तरी, ‘टीडीएम’ सिनेमाच्या टीमला मात्र एका वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
TDM Film Director
TDM Film DirectorFacebook

TDM Film Director: मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरतो. अनेक मराठी चित्रपट सध्या थिएटरमध्ये दिलासादायक कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘टीडीएम’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करत आहे. सोबतच ‘टीडीएम’नेही महाराष्ट्रात आपली एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. जरी चित्रपटाची चर्चा सर्वत्र जोमात सुरू असली तरी, ‘टीडीएम’ सिनेमाच्या टीमला मात्र एका वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

TDM Film Director
Salman Khan Threat And Kangana Ranaut: 'देश मोदी-शाह यांच्या हातात सुरक्षित', सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर कंगनाचं वक्तव्य

अवघ्या महाराष्ट्रात ‘टीडीएम’ चित्रपटाची चर्चा होत असून हा रोमँटिक चित्रपट २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. चित्रपटाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ महाराष्ट्रातल्या तरूणाईंमध्ये पाहायला मिळत आहे. ‘ख्वाडा’, ‘बबन’ फेम भाऊराव कऱ्हाडेंच्या ‘टीडीएम’ या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. कायमच अस्सल मातीतले हिरे वेचून त्यांना अभिनयाची संधी देणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांच्या याही सिनेमाची चर्चा होती. पण TDM सिनेमाच्या टीमला मात्र वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. (Entertainment News)

TDM Film Director
MUSANDI Marathi Movie Teaser Out: समाजाचे दाहक वास्तव दाखविणाऱ्या 'मुसंडी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

चित्रपटाबाबत आज कलाकारां आधीच प्रेक्षकांनीच पुढाकार घेत शो का नाहीत अशी विचारणा केली. या संपूर्ण चित्रावर 'टीडीएम' चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झालेत. यावेळी बोलताना भाऊराव म्हणतात, “आज 'टीडीएम' चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र चित्रपटगृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. ” (Marathi Film)

“आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. आम्ही असं म्हणत नाही आमचा सिनेमा चांगला आहे, पण सिनेमाला प्रेक्षक प्रतिसाद देत असताना शो रद्द करणं हे कितपत योग्य आहे. परवा पासून पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात एक शो होता, काल दोन शो होते चित्रपट गृह तुडुंब भरलेले असताना ही वाढवून शो दिलाच नाही. लोकांना चित्रपट पाहायचाय त्यांची मागणी आहे, म्हणून मी स्वतः थेटर मालकांजवळ विचारपूस केली तर त्याच असं म्हणणं आहे की एकच शो लावा असा वरून प्रेशर आहे.”

“माझ्या चित्रपटाला जे शो मिळाले आहेत ते पण प्राईम टाईम मधील नसून ऑड टाईममधील आहेत, आणि ऑड टाईम असल्यामुळे प्रेक्षकांना त्या वेळेत तिथवर पोहोचणं शक्य नाही आहे आणि हे सर्व पाहून आम्हाला खूप त्रास होतोय. माझा चित्रपट नसेल आवडला तर स्पष्ट मला लोकांनी सांगावं की, तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस त्या दिवशी मी सिनेमा निर्मितीच काम बंद करेन'. असं म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले.” (Marathi Actors)

‘टीडीएम’ चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. इतकंच नव्हे तर पुण्यात ‘टीडीएम’ चे शो हाउसफुल आहेत. पण अनेक प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा चित्रपट पाहण्याची इच्छा असतानाही केवळ कमी शो असल्याने ‘टीडीएम’ प्रेक्षकांना पाहता येत नाहीये. आज नुकतंच ‘टीडीएम’ चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि मुख्य कलाकार कालिंदी निस्तने आणि पृथ्वीराज यांनी प्रेक्षकांना हात जोडून ही दयनीय अवस्था सांगितली.

सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय, परंतु शो नसल्याने प्रेक्षकांना माघारी जावं लागतंय. या अवस्थेमुळे सर्व टीमच्या डोळ्यात पाणी आलं. “आमच्यावर प्रेशर आहे.” असं म्हणत थिएटर मालकांनी हात वर केलेत. आता थिएटर मालकांवर नेमकं कसलं प्रेशर आहे, ही माहिती अद्याप तरी, गुलदस्त्यात आहे.

TDM Film Director
Anushka Sharma Top 5 Movies IMDB Rating: अनुष्काचे 'हे' आहेत टॉप रेटिंग चित्रपट, एक नंबरला तर तोडच नाही...

२८ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आज चित्रपटाचे प्रमोशन करताना चित्रपटगृहात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असताना, चित्रपटगृहात आपल्या चित्रपटाला शोच नाहीत ही बाब लक्षात येता या विषयावर दोन शब्द मत मांडणाऱ्या 'टीडीएम' चित्रपटातील कलाकारांचा उर भरून आला. आज मराठी चित्रपटांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनीच कलाकारांच्या, निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं ही आपली जबाबदारी समजूया.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com