Thank You For Coming Trailer: भूमी, शेहनाज, कुशा करणार राडा; गर्ल बॉडिंगवरील बोल्ड चित्रपट 'थँक यू फॉर कमिंग' ट्रेलर रिलीज

Bhumi Pednekar Movie: भूमी पेडणेकर स्टारर 'Thank You For Coming' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Thank You For Coming.
Thank You For Coming.Instagram @bhumipednekar

Bhumi Pednekar Movie Trailer Out:

भूमी पेडणेकर स्टारर 'Thank You For Coming' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. करण बुलानी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शहनाझ गिल, कुशा कपिला, डॉली सिंग शिबानी बेदी, प्रद्युमन सिंग मल्ल, नताशा रस्तोगी, गौतमीक, सुशांत दिवगीकर, सलोनी दैनी, डॉली अहलुवालिया आणि कारण कुंद्रा मुख्य भूमिकेत आहेत.

भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवरून 'थँक यू फॉर कमिंग'चा ट्रेलर शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत भूमी पेडणेकरने लिहिले आहे की, "या राजकुमाराची कथा सर्वात हटके आहे ! 6 ऑक्टोबर 2023 रोजी #ThankYouForComing पाहण्यासाठी चित्रपटगृहात यायला विसरू नका."

Thank You For Coming.
Ankita Lokhande Interview: मी 3 महिने घरीच गेले नव्हते... 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने सांगितली 14 वर्षांपुर्वीची आठवण

'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट 6 ऑक्टोबर, 2023 ला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूप खतरनाक आहे. खूप वेगळी कथा आपल्याला या चित्रपटांध्ये पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरून दिसत आहे.

ट्रेलरची सुरुवात भूमी पेडणेकर तिचा 30 वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. ३० वर्षाच्या भूमी पेडणेकरला रिलेशनशिपमध्ये असूनही कधीही आनंद अनुभवता आला नसल्याचे ती सांगते.

ट्रेलरची टॅगलाईन आहे की, 'फेरीटेल्स झूठ है, लव झूठ है, ऑर्गेज्म झूठ है.' ट्रेलरमध्ये भूमी फेअरीटेलमधील रोमान्स आणि आनंद खऱ्या आयुष्यात शोधात आहे. यासाठी तिच्या मैत्रिणीं तिला पाठिंबा आणि आवश्यक सल्ले देतात. (Latest Entertainment News)

चित्रपटातील संवाद खूप कॉमेडी आहेत. याव्यतिरिक्त ट्रेलरमध्ये अनिल कपूरची देखील एंट्री दाखविण्यात आली आहे.

थँक यू फॉर कमिंगचे दिग्दर्शक करण बुलानी रिया कपूरचे पती आहेत. त्याचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची पटकथा राधिका आनंद आणि प्रशस्ती सिंग यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड आणि अनिल कपूर फिल्म कम्युनिकेशन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com