वाढदिवसा निमित्त अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा; आज पासून 'हे' काम बंद !

अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर ट्रोल देखील होत होते पैशासाठी कोणतही कृत्य करणार का?
वाढदिवसा निमित्त अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा; आज पासून 'हे' काम बंद !
वाढदिवसा निमित्त अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा; आज पासून 'हे' काम बंद !SaamTV

मुंबई : हिंदी सिनेमा सृष्टीतील महानायक, संपुर्ण जगात आपल्या अभिनयाने नावारुपास आलेले व्यक्तिमत्व म्हणजेच अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांचा आज 79 वा वाढदिवस Birthday असून आजच्या दिवशीच त्यांनी (बिग बी) BIg-'B' या नावाप्रमाणे मोठा निर्णय घेतला आहे.आपण करत असलेले कमला पसंत Kamala Pasand या पान मसाला कंपनीची जाहीरातीचे काम बंद करत असल्याच आणि त्या जाहीरातीच्या Advertising करारातून माघार घेतल्यांच आज बच्चन यांनी जाहीर केलं आहे. (Big announcement by Amitabh Bachchan on the occasion of his birthday)

हे देखील पहा -

सोशल मिडीयावर ट्रोल

त्याला कारण म्हणजे त्यांनी सुरु केलेली ही जाहीरात Advertising त्यांच्या अनेक चाहत्यांना आवडली नव्हती. आणि त्यामुळे अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर ट्रोल Troll on social media देखील होत होते पैशासाठी कोणतही कृत्य करणार का? असा सवाल त्यांचे चाहते विचारु लागले होते. अर्थातच त्याला कारण होतं ते करत असलेली 'कमला पसंत' या पान मसाल्याची जाहीरात आणि त्यामुळेच त्यांनी आज आपल्या 79vv व्या वाढदिसादिवशी या जाहीरातीच्या करारामधून माघार घेतल्याच जाहीर केल्याने त्यांच्या चाहत्यामध्ये त्यांच्या बद्दलचा आदर वाढला आहे.

त्यांच्या या सकारात्मक निर्णयामुळे नेटकरी 'बडे दिलवाला बिग बी' असं देखील म्हणू लागले आहेत. बच्चन यांनी आपल्या 'ब्लॉग'च्या Blog माध्यमातून आज पासून मी करत असलेली कमला पसंत या पान मसाला ची जाहिरात बंद करत असून त्या जाहिरातीसाठीच्या कराराचे पैसे आपण मागे देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. अमिताभ बच्चन ही पान मसाल्याची जाहिरात करत होते ते अनेक जणांना पटले नव्हते त्यावरून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केल जात होतं. आपण आजचा निर्णय हा घेतला आहे की नव्या पिढीला पान मसाल्याची सेवन करायचं प्रोत्साहन Motivation मिळू नये यासाठी मी माघार घेत असल्याचे म्हणाले.

डॉक्टरांची जाहीराती मधून माघार घेण्याची विनंती

वाढदिवसा निमित्त अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा; आज पासून 'हे' काम बंद !
"आजचा 'बंद' हा शरद पवारांनी जाहीर केलेला; खुर्ची टिकवण्यासाठी हे करावं लागत"

नॅशनल अँटी टोबॅको ऑर्गनायझेशन National Anti-Tobacco Organization ने देखील अमिताभ बच्चन यांना विनंती केली होती की आपण या जाहिरातीतून माघार घ्यावी कारण ते एका बाजूला भारत सरकार कडून पोलिओ चे ब्रॅंड अॅम्बेसेडर Polio's brand ambassador आहेत यासाठी डॉ. शेखर साल्कर Dr. Shekhar Salkar यांनी बच्चन यांना पत्राद्वारे त्यांनी या जाहीराती मधून माघार घेण्याची विनंती देखील केली होती.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com