Amitabh Bachchan Photo: थ्रो-बॅक फोटोसह अमिताभ यांनी शेअर केला किस्सा; म्हणाले 'नशीब माझं…'

थ्रो-बॅक फोटो शेअर करत अमिताभ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSaam tv

Amitabh Bachchan Shares Throwback Photo: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना चित्रपटामध्ये येण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. अमिताभ यांच्या आवाजावरून आणि उंचीवरून नाकारले गेले. आता त्यांची बॉलिवूडमधील उंची कोणालाही गाठता येणार नाही इतकी आहे.

काल म्हणजे ६ फेब्रुवारीला बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. थ्रो-बॅक फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अमिताभ यांनी त्यांचा उंटावर बसलेला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. तर त्यांच्या मागे चित्रपटाचे शूटिंगचा सेट दिसत आहे. अमिताभ यांनी फोटो शेअर करत त्यांची एक आठवण सांगितले आहे. अमिताभ यांनी म्हटले आहे की, मी उंच असल्याने मला तेव्हा सगळे उंट म्हणायचे.

Amitabh Bachchan
Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या मंडळीतून आणखी एका स्पर्धकाची एक्झिट, आवडत्या स्पर्धकाच्या जाण्याने शिव झाला भावुक

अमिताभ त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, १९६९ साली जेव्हा मी चित्रपटामध्ये काम करायला सुरूवात केली तेव्हा सगळे मला उंट म्हणायचे. हा फोटो माझा दुसरा चित्रपट 'रेशमा और शेरा'मधील आहे. जैसलमेरपासून दूरवर असलेल्या पोचीना वाळवंटातील हे लोकेशन आहे. माझे सौभाग्य आहे की आता मला कोणी उंट बोलत नाही. कारण आता हे टायटल अनेक दुसऱ्या लोकांसाठी वापरले जाते.

अमिताभ यांच्या पोस्टनंतर नेटकरी कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे- सर, हरियाणाच्या ग्रामीण भागात तुम्हाला लंबू म्हणतात. लोक म्हणतात, काल लंबूचा चित्रपट पाहिला, खूप मजा आली.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘श्रीमान, त्या लोकांनी तुम्हाला बरोबर नाव दिले होते, कारण जसा उंट न थकता न थांबता वाळवंटाची उंची ठिकाणे गाठतो, त्याचप्रमाणे तुम्हीही बॉलिवूडमध्ये उंची गाठली आहे.

तिसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे, माझे काका युसूफ म्हणजेच दिलीप साहेबांचे चाहते होते. म्हणूनच ते तुमचे वर्णन करण्यासाठी हाच शब्द वापरायचे. त्यामुळे मी नेहमी त्याच्याशी भांडत असे. काय दिवस होते ते.

अमिताभ बच्चन 'उंचाई' चित्रपटात शेवटचे दिसले होते. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता, सारिका आणि परिणीती चोप्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट चार मित्रांच्या जीवनावर आधारित होता. बिग बी आता दीपिका, प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर आदिपुरुषमध्ये दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com