Attacked On Gori Nagori
Attacked On Gori NagoriInstagram @real_gorinagori

Gori Nagori Shares Video: बिग बॉस फेम अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला, जवळच्या व्यक्तीवर केला गंभीर आरोप

Attacked On Gori Nagori: गोरी नागोरीने आरोप केला आहे की त्यांच्या टीमवर हल्ला करण्यात आला आहे.

Big Boss Fame Actress Has Life Threat: राजस्थानची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम गोरी नागोरी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गौरी नागौरी राजस्थान पोलिसांकडे मदतीसाठी याचना करताना दिसत आहे.

गोरी नागोरीने आरोप केला आहे की त्यांच्या टीमवर हल्ला करण्यात आला असून बाउन्सर आणि मॅनेजरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यात गौरीला देखील मारहाण करण्यात आली. 22 मे रोजी रात्री 2.00 वाजताच्या सुमारास अजमेरच्या गेगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

हा व्हिडिओ तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करताना गौरी नागौरीने सांगितले की, 22 मे रोजी तिच्या बहिणीचे लग्न होते. तिचा मोठा मेहुणा जावेद हुसेन म्हणाला की, तुमचा विवाह किशनगडमध्ये करा, मी सर्व व्यवस्था करीन.

मेहुण्याच्या सांगण्यावरून किशनगड येथे लग्न झाले. हे सर्व षडयंत्र होते हे मला माहीत नव्हते, असा आरोप गौरी नागौरी यांनी केला आहे. लग्नानंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास विदाई होत असताना, मेव्हणा जावेद हुसेन यांच्यासह नातेवाईक व मित्रांनी मिळून हल्ला केला.

माझी टीम बचावासाठी आली असता त्यांनाही हाणामारी करण्यात आली. माझेही केस ओढले आणि टीम मेंबरचे डोके फोडले. व्हिडिओमध्ये गौरी नागौरीने जावेद हुसैन, मुबारक हुसैन, वसीम, इस्लाम, नसीर, साजिद, शब्बीर मामा, साबीर, फतेह खान, आरिफ, इमरान, अर्शद आणि इमरान यांच्यासह अनेकांवर हल्ला करून त्यांची जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप गौरी नागौरीने केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com