Shamshera Box Office Collection Day : बिग बजेट 'शमशेरा'ची चर्चा खूप; पण कमाईच्या बाबतीत गटांगळ्या

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने 'शमशेरा' चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा एन्ट्री केली. निर्माते आणि कलाकारांसोबतच बॉलिवूडलाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
Big budget film Shamshera could not make a good opening at the box office
Big budget film Shamshera could not make a good opening at the box officeSaam Tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने(Ranbir Kapoor) 'शमशेरा' चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा एन्ट्री केली. निर्माते आणि कलाकारांसोबतच बॉलिवूडलाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. कोरोनाच्या कालावधीनंतर ज्याप्रकारे हिंदी चित्रपटसृष्टी संकटातून जात आहे. चित्रपट निर्मात्यांनीही धास्ती धरली आहे. मोठ्या बजेटचा चित्रपट 'शमशेरा' (Shamshera) बॉक्स ऑफिसवर खास ओपनिंग करू शकला नाही. १५० कोटी खर्चून बनलेला हा चित्रपट रीलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी फक्त १० कोटींची कमाई करू शकला. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या यशराज फिल्म्सच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी कमाई केली आहे. अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.४ कोटींची कमाई केली होती.

Big budget film Shamshera could not make a good opening at the box office
टीव्ही इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का; 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याचे निधन

माहितीनुसार, 'शमशेरा' चित्रपट मुंबईत काही खास गल्ला जमवू शकला नाही. कोरोनाच्या कालावधीनंतर, हा चित्रपट ४ हजारांहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. माहितीनुसार, पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचे मनासारखे प्रेम मिळालेले नाही. अशा स्थितीत चित्रपटाच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

Big budget film Shamshera could not make a good opening at the box office
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चे बजेट 500 कोटी, निर्मात्यांनी सांगितली रिलीजची तारीख

ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करत, 'शमशेरा'चे काही शो प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे रद्द करावे लागले. काही चित्रपटगृहांना शमशेराचे सकाळ आणि दुपारचे शो प्रेक्षक अनुपस्थित असल्याने रद्द करावे लागले', असे म्हटले आहे. यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये कोमल नाहटा यांनी, 'शमशेराच्या खराब सुरुवातीमुळे आधीच चिंताग्रस्त असलेली हिंदी चित्रपटसृष्टी आणखी धास्तावली आहे. दुर्दैवाने या मोठ्या बजेटच्या चित्रपटाचे कलेक्शन खूपच कमी झाले, असेही नमूद केले आहे.

अशीच परिस्थिती राहिली तर यशराज फिल्म्सचा हा तिसरा फ्लॉप चित्रपट ठरू शकतो. यापूर्वी 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'जयेशभाई जोरदार' बॉक्स ऑफिसवर चालू शकले नाही. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या YRFच्या 'वॉर' या चित्रपटानंतर कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. 'शमशेरा'कडूनही अपेक्षा होत्या, पण त्याही फोल ठरल्याचे पहिल्या दिवशीच दिसून आले. त्यामुळे जानेवारी २०२३ मध्ये रीलीज होणाऱ्या 'पठाण'कडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com