Big News: बिग-बी यांचा 'तो' सुरक्षारक्षक कोट्याधीश नाही; प्राथमिक चौकशीत क्लीन चिट

ज्यावेळी सुरक्षारक्षक जितेंद्र शिंदे यांची वार्षिक कमाई दीड कोटी व मासिक १२ लाख रुपयांची असल्याच्या आरोप झाला, त्यावेळी प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरले होते.
Big News: बिग-बी यांचा 'तो' सुरक्षारक्षक कोट्याधीश नाही; प्राथमिक चौकशीत क्लीन चिट
Big News: बिग-बी यांचा 'तो' सुरक्षारक्षक कोट्याधीश नाही; प्राथमिक चौकशीत क्लीन चिटSaam Tv

मुंबई: बिग-बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुरक्षेस असलेल्या पोलिस शिपाईचा कमाईवरून मध्यंतरी मोठी चर्चा रंगली होती. मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) असे पोलिस दलातील या सुरक्षारक्षकाचे नाव असून तो २०१५ पासून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. ज्यावेळी जितेंद्र शिंदे यांची वार्षिक कमाई दीड कोटी व मासिक १२ लाख रुपयांची असल्याच्या आरोप झाला, त्यावेळी प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरले होते. (Big B's security guard is not a billionaire; Clean Chit in the Preliminary Inquiry)

हे देखील पहा -

या आरोपानंतर मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार एकाच ठिकाणी कित्येक वर्ष कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यात करण्यात आल्या त्यानुसार शिंदेची बदली डी.बी. मार्ग पोलिस ठाण्यात झाली. ही बदली जरी नियमीत असली तरी शिंदेंवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत पोलीस आयुक्तांकडून चौकशीचे आदेश संरक्षण व सुरक्षा शाखेला देण्यात आले होते. शिंदे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल नुकताच मुंबई पोलीस आयुक्त हेंमंत नगराळे यांना सुपूर्त करण्यात आला आहे.

या अहवलात शिंदे यांच्या विरोधातील दीड कोटी रुपयांचा आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. चौकशीत याप्रकरणाशी संबंधीत सर्व व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले होते. तसेच शिंदे यांच्या बँक खात्याचीही तपासणी करण्यात आली होती. त्यात शिंदे यांच्याकडून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांनी मुंबईत खरेदी केलेले घर हे जुनी मालमत्ता विकून व गृहकर्ज घेऊन खरेदी केल्याचेही तपासणीत निष्पन्न झाले आहे.

Big News: बिग-बी यांचा 'तो' सुरक्षारक्षक कोट्याधीश नाही; प्राथमिक चौकशीत क्लीन चिट
अबब! कुरीअरच्या बॉक्स मधून चक्क निघाला विषारी 'कोब्रा'

तसेच अमिताभ बच्चन यांना पोलिसांव्यतिरिक्त ज्या खासगी कंपनीकडून सुरक्षा पुरवली जाते ती शिंदेंच्या पत्नी व मित्राच्या नावे असल्याचा आरोप झाला होता. मात्र संबधित कंपनीचे कंत्राट व व्यवहार ही खासगी बाब असल्याने पोलीस म्हणून शिंदे यांच्याकडून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या अहवालानंतर त्यावर निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार पोलीस आयुक्तांना आहे. पण प्राथमिक चौकशीत तरी आरोपांमध्ये कोणतीही तथ्य नसल्याचे निष्पन्न झाल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com