Akanksha Dubey Case:भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; २ संशयित...

Bhojpuri Actress: आकांक्षा दुबे आत्महत्येवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Akanksha Dubey Big Update
Akanksha Dubey Big UpdateInstagram @akankshadubey_official

Akanksha Dubey Case Update: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने २६ मार्च रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी आकांक्षा इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. तसेच त्याआधी शेअर केलेल्या एक व्हिडिओमध्ये ती डान्स करत होती आणि खूप आनंदी दिसत होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणाचा सुरू केला आहे. एसीपी संतोष कुमार सिंह यांनी याविषयी अपडेट शेअर केली आहे. ते म्हणाले आहेत की, अभिनेत्रीच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांचे म्हणणे आहे की अभिनेत्री मृत्यूच्या आदल्या रात्री एका पार्टीतून परतली होती.

इतकंच नाही तर तिच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओही सापडले आहेत ज्यात ती रडताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीच्या आईनेही तक्रार दाखल केली असून समर सिंह आणि संजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलीस आकांक्षाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

Akanksha Dubey Big Update
Chandravilas Title Track:सुप्रसिद्ध हिंदी गायिकेने केले मराठी शीर्षकगीताचे पार्श्वगायन

आकांक्षा दुबेने आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. त्यात ती खूप शांत-शांत दिसत होती. नंतर ती रडतानाही दिसली. सर्व चाहते तिला रडण्याचे कारण विचारत होते पण तिने काहीच सांगितले नाही. इतकंच नाही तर इन्स्टाग्रामवरील अभिनेत्रीच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये ती खूप खुश दिसत होती. तिला पाहून तिला काही प्रॉब्लेम आहे असे वाटले नाही.

मेकअप आर्टिस्ट आणि पोलिसांनी आपापल्या बाजू मांडल्या होत्या. तिच्या मावशी आणि काकांनीही मीडियाशी बोलताना समर सिंहवर गंभीर आरोप केले होते. समर सिंहने आकांक्षाला मारून बाहेरून कुलूप लावल्याचे तिच्या मावशीने सांगितले होते.

तर पोलिसांनी सांगितले की, आकांक्षा दुबे ज्या हॉटेलमध्ये राहत होती त्या खोली दार आतून बंद होते. पोलिसांना यात काही गैर दिसत नाही. तरी ते या प्रकरणाचा तपास करत आहे. सध्या सर्वांच्या नजरा अभिनेत्रीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर खिळल्या आहेत. ते येताच सर्व काही स्पष्ट होईल. याशिवाय तिचा फोनचीही तपासला जात आहे.

आकांक्षा दुबे समर सिंहला डेट करत होती. ती त्यांच्यासोबत नेहमी रील बनवायची आणि अपलोड करायची. मात्र काही काळ त्याने तसे करणे बंद केले होते. समर सिंगवर अभिनेत्रीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, तो तिला जीवे मारण्याची धमकी देत होता​​. यामध्ये त्याच्या भावाचाही समावेश आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com