Jhund: झुंड चित्रपटातील कलाकारावर दागिने चोरल्याचा आरोप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झुंड चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रियला चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केली आहे.
Jhund Movie Poster
Jhund Movie PosterSaam Tv

Jhund: बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेले आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.चित्रपटातील सर्व कलाकार नेहमीच चर्चेत असतात. त्यातील एक कलाकार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रियला चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केली आहे. १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रियला नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रियांशूने ‘झुंड’ चित्रपटात बाबू ही भूमिका साकारली होती.

Jhund Movie Poster
New Biopic Movie: रतन टाटांचा बायोपिक येणार, त्यांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता…

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावेंच्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेले होते. याप्रकरणात मोंडावे यांनी पोलीसात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मोंडावे कुटुंबाच्या नागपुरातील सध्या स्थित असलेल्या घरातून हा लाखोंचा ऐवज चोरी झाला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते.

Jhund Movie Poster
Richa Chadha: निर्माते अशोक पंडित यांची अभिनेत्री रिचा चढ्ढा विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार

त्याची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा उर्फ बाबूचा सहभाग असल्याचा त्याने खुलासा केला. यानंतर मंगळवारी नागपूर पोलिसांनी प्रियांशू क्षत्रियाला अटक केली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांशूला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तसेच पुढे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमामध्ये या परिसरातील काही भाग चित्रीत करण्यात आला आहे.

Jhund Movie Poster
Alia-Ranbir Daughter Name: आलिया-रणबीरने अखेर सांगितले मुलीचे नाव, जाणून घ्या काय आहे तिच्या नावाचा अर्थ?

समीक्षकांकडून चित्रपटाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. झुंड चित्रपट विजय बारसे या माजी क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित असून त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी फुटबॉलशी परिचय करुन दिला. त्यांनी तेथील झोपडपट्टीतील मुलांना योग्य शिकवण देत सर्वांचीच वृद्धी केलेली दिसत आहे.

Jhund Movie Poster
Vicky Kaushal: विकी कौशलने वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, फोटो शेअर करत केली भावनिक पोस्ट

प्रियांशू क्षत्रियला यापूर्वी ही रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन, किशोर कदम, छाया कदम, रिंकु राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे, अंकुश गेदाम, प्रियांशु क्षत्रिय, रजिया काजी सह इतरांच्या मुख्य भूमिका आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com