Big Boss 15: बाब्बाे! गप्प बसेल ताे अभिजीत बिचुकले कसला; भाईजानवर डाफरला

दाराच्या दिशेने तरातरा चालत अभिजीतने XXX में गया शाे असंही म्हटलं.
bigg boss 15 salman khan scolds to pull abhijit bichukale out of the house by his hair latter retaliates bhaad me gaya aapka show
bigg boss 15 salman khan scolds to pull abhijit bichukale out of the house by his hair latter retaliates bhaad me gaya aapka showsaam tv

सातारा : मराठी बिग बाॅस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) बिग बाॅस १५ (big boss 15) मध्ये पदार्पण केल्यापासून त्याच्या वर्तणुकीवरुन वादात राहिला आहे. आता तर त्याने अभिनेता सलमान खान याच्याबराेबरच पंगा घेतल्याचे दिसत आहे. सलमान खान (salman khan) याने अभिजितला त्याच्या वर्तणुकीवरुन फटकारले. तसेच तुझ्या केसांना धरुन घरा बाहरे काढीन असं म्हटलं. त्यावर बिचुकले (Abhijeet Bichukale) गप्प राहिला नाही. त्याने त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताच सलमान त्याच्यावर खूप चिडला आणि म्हणाला, “तू बोलेगा, मैं घर में आके तेरेको मार के जाऊंगा.” (bigg boss 15 salman khan scolds to pull abhijit bichukale out of the house by his hair latter retaliates bhaad me gaya aapka show)

सलमानच्या या वाक्यावर अभिजित बिचुकले तडकन उभा राहिला आणि आक्रमकपणे रिअॅक्ट झाला. त्याने स्वतःहून शोमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. दाराच्या दिशेने तरातरा चालत अभिजीतने XXX में गया शाे असंही म्हटलं.

bigg boss 15 salman khan scolds to pull abhijit bichukale out of the house by his hair latter retaliates bhaad me gaya aapka show
Fatima Sheikh: यांचा Google Doodle द्वारा गाैरव

सलमान खान अनेक स्पर्धकांना त्यांच्या घरातल्या वागणुकीबद्दल फटकारत असतो. त्याच्या क्रोधाला सामोरे जाणाऱ्या अनेक स्पर्धकांपैकी एक म्हणजे बिग बॉस १५ चे चॅलेंजर अभिजित बिचुकले, मुख्यतः सह-स्पर्धकांसोबत संवाद साधताना अपशब्द वापरल्याबद्दल त्यास नेहमी बाेलणी खावी लागत असतात.

सलमान खान बिचुकलेस म्हणाला, “ये जो आपने गंधी गंधी गलियां दी थी, कोई दूसरा आपके परिवार को दे तो आपको कैसा लगेगा? ये वॉर्निंग दे रहा हूँ, मिड-वीक आके निकल के ले जाऊंगा यहाँ से, बाल पकड के.” यावर बिचुकलेने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला परंतु तेथेही त्यास सलमानने फटकारले.

बिग बाॅस १५ मधील बिचुकले विषयीचे वादाचे विषय

देवोलिना भट्टाचार्जीशी कमेंटवरून भांडण.

चुंबन घेण्याचा आग्रह.

शमिता शेट्टीला पायातील चप्पल म्हणणे.

करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश यांच्यावर असभ्य बाेलणे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com