
Bigg Boss 16 Episode Update: 'बिग बॉस 16' हा टीव्हीवरील वादग्रस्त शो आहे. परंतु या बिग बॉसच्या घरात मैत्री आणि प्रेम फुलताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. बिग बॉसच्या घरात अनेकदा घट्ट मैत्रीही तुटल्याचे पाहायला मिळाले आहे. आता अंकित आणि प्रियांका बिग बॉसच्या घरात कॉफीवरून भांडताना दिसत आहेत. कॉफीवरून दोघांमध्ये मस्करी सुरु होती. मस्करी इतकी वाढली की प्रियांका रडल्यानंतरच तो विषय संपला. प्रियांका आणि अंकित या दोघांची मैत्री खूप चांगली आहे, पण क्षुल्लक गोष्टीवरून दोघांमध्ये खूप वादविवाद होते असतात.
बिग बॉसच्या घरात दिवसाची सुरुवात प्रियांका आणि अंकितमधील भांडणाने झाली. अंकितने सकाळी पहिल्यांदा प्रियांकासाठी कॉफी बनवली आणि आणली. त्यानंतर प्रियंका म्हणाली की तू फक्त एकदाच कॉफी आणलीस आणि आज तू मला ती मोजून दाखवलीस. यावर अंकित म्हणतो की, हिच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही, तू नेहमीच बरोबर असतेस आणि आम्ही नेहमीच चुकीचे असतो. (Bigg Boss)
यानंतर प्रियांका म्हणते की, असे कधी घडले आहे की मी तुझी कोणासोबत थट्टा केली आहे. अंकित अर्चनाचे नाव घेतो आणि म्हणतो, ती जेव्हा काही बोलते तेव्हा तुम्हीही हसत नाही का? यानंतर अंकित म्हणतो की माझा मुद्दा असा आहे की मला मस्करी समजते. प्रियांका म्हणते की हा एक विनोद होता. अंकित म्हणतो की, हा विनोद होता. तर प्रियांका रागात म्हणते, मग मला तुझा जोक वाईट वाटला, पुढच्या वेळी असे करू नकोस.
यानंतर प्रियांका म्हणते की, मी या घरात तुझ्या वाट्यासाठी तसेच माझ्या वाट्यासाठी लढले आहे. यानंतर अंकित म्हणतो की, तू हे तीन दिवसांपासून सांगत आहेस. तू जे काही करत आहात, ते तुझ्या मनाने करत आहेस… म हे सगळ बोलून का दाखवत आहेस? हे ऐकून प्रियांकाला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
तसेच अर्चना आणि सौंदर्या यांच्यात सुद्धा भांडण पाहायला मिळाले. आधी दोघांमध्ये वाद झाला, नंतर एकमेकांना मिठी मारून एकमेकांच्या तक्रारी त्यांनी दूर केल्या. सौंदर्याने अर्चनाला स्पष्ट केले की ती नेहमीच तिच्या बाजूने उभी असते आणि तिच्यामुळे साजिद खान तिच्याशी खूप वाईट बोलला आहे. मात्र, नंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. (Celebrity)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.