Bigg Boss 16: 'आगीमध्ये तेल ओतण्याचे काम करू नका', सलमान खानने स्पर्धकांना सुनावले

सलमान खान या शनिवारी घरातील सदस्यांवर चांगलाच भडकला होता. शालीन आणि सुंबुल दोघांनीही सलमाने त्यांची चूक समजावून सांगितली.
Salman Khan Got Angry on All the contestants of Bigg Boss 16
Salman Khan Got Angry on All the contestants of Bigg Boss 16Saam Tv

Bigg Boss 16 Episode Update: बिग बॉसच्या घरात वाद झाला नाही असे फारच क्वचित पाहायला मिळते. बिग बॉसच्या चाहत्यांना रोज काहीतरी नवीन पाहायला मिळते. आठवडाभर घडलेल्या घटनांमुळे सलमान खान घरातील स्पर्धकांची जी शाळा घेतो, ते पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं. सलमान खान या शनिवारी घरातील सदस्यांवर चांगलाच भडकला होता. शालीन आणि सुंबुल दोघांनीही सलमाने त्यांची चूक समजावून सांगितली.

Salman Khan Got Angry on All the contestants of Bigg Boss 16
Rishabh And Urvashi: ऋषभ- उर्वशीच्या प्रेमाची कबुली मित्राने दिली, खुलास्याने सर्वांच्याच नजरा उंचावल्या

घर सोडण्याचा असे म्हणणाऱ्या शालीनने त्याचा निर्णय बदलला. सलमानने ऐकवल्यामुळे सुंबुल खूप रडत होती. तसेच सलमानने आणखी दोन व्यक्तींनाही खडसावले. ज्याचा शालीन आणि स्टॅन यांच्यातील वादात काहीही संबंध नव्हता. स्टॅन शालीनच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्याशी हाणामारी करण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा शालीनने त्याला आपल्या हातांनी लॉक केले. त्यामुळे तेथे मारामारी झाली नाही. (TV)

वादनानंतर प्रकरण शांत होत होते, इतक्यात प्रियांकाने या वादात उडी घेतली. वाद संपल्यानंतरही प्रियांकामुळे वाद सुरूच राहिला. या सगळ्यात प्रियांकाचा काहीही संबंध नसताना तिने प्रकरणात हस्तक्षेप केला होता. इतकेच नाही तर अंकित गुप्ताने बिग बॉसला धमकीही दिली होती की, स्टॅनला घराबाहेर काढले नाही तर तो घर सोडून जाईल. शनिवारच्या वॉरमध्ये सर्वांची शाळा घेतल्यानंतर सलमानने प्रियांकाला जाब विचारला. प्रियंकाला मात्र आपली चूक कळलीच नाही. (Program)

सलमानने प्रियांकाला सांगितले की, तू मारामारी होत आहे हे पाहिले आणि तू त्या भांडणात तूप ओतले. तुम्ही तुमचा मुद्दा बळजबरीने दुसऱ्याच्या इश्यूमध्ये टाकता. तुला काही म्हणायचे नव्हते, तरीही तू मध्येच ओरडत होतीस. सलमानचे हे बोलणे ऐकून प्रियांकाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सलमानने तिच्याशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. (Salman Khan)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com