Bigg Boss 16: शालीन बिग बॉसचं घर सोडणार, टीना दत्ताच्या त्या एका कृत्यामुळे घेतला निर्णय

टीना दत्ताने एमसी स्टॅनला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही माघार घेतली नाही. एकमेकांना शिवीगाळ केली आणि काही वैयक्तिक कमेंटही केल्या.
Shalin Bhanot Leaving Bigg BOss House
Shalin Bhanot Leaving Bigg BOss HouseSaam Tv

Bigg Boss 16 Episode Update: 'बिग बॉस 16' हा प्रचंड वादग्रस्त शो आहे. या शोमध्ये स्पर्धाकांचे रोज वाद होत असतात. हे वाद इतके विकोपाला जातात की बिग बॉसना हस्तक्षेप करावा लागतो. 'शुक्रवार का वार' या आठवड्यातील भागामध्ये सलमान खान दिसला नाही. पण या भागात बिग बॉसने त्याची कमी भरून काढली आणि शालीन भानोतची चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर शालीनने घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. शालीन, टीना दत्ता आणि एमसी स्टॅनसह स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आले होते आणि बिग बॉसने टीनाला विचारले की स्टॅन आणि शालीन दोघांपैकी कोणाची चूक होती. पण शालीनने बिग बॉसचे म्हणणे नाकारले आहे. शालीनने त्याला स्वेच्छेने शोमधून बाहेर पडायचे असल्याचे सांगितले आहे.

Shalin Bhanot Leaving Bigg BOss House
Katrina Kaif: कतरिना कैफ पापाराझींवर संतापली, म्हणाली 'आमचे खासगी आयुष्य...'

शालिन भानोतने बिग बॉसला सांगितले की, त्याला शोमध्ये असुरक्षित वाटत आहे. यानंतर त्याने स्वेच्छेने शोमधून बाहेर पडायचे असल्याचे जाहीर केले. यानंतर बिग बॉसने शालीनला शो सोडण्याच्या अटींची आठवण करून दिली आणि स्वेच्छेने शो सोडल्यास भराव्या लागणाऱ्या दंडाचाही उल्लेख केला. शालीनने ते सुद्धा मान्य केले. (Bigg Boss)

शालीन भानोत याने दंड भरणार असल्याचे सांगितले. यानंतर शालीनने लगेच शो सोडण्याविषयी विचारले, परंतु बिग बॉसने नकार दिला. सलमान खान आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल बिग बॉसने शालीनला सांगितले. त्यानंतर तो कन्फेशन रूममधून बाहेर गेला आणि प्रियांका चौधरीच्या खोलीमध्ये याविषयी चर्चा करू लागला. शालीन प्रियंकाला काहीतरी सांगत होता, पण बिग बॉसने व्यत्यय आणला आणि त्याला पुन्हा कन्फेशन रूममध्ये बोलावले. (Salman Khan)

प्रियांका चौधरी पुन्हा शालीन भानोतला त्याच्या शो सोडून जाण्याविषयी विचारले. शालीनने पुन्हा नकार दिला. त्यावर बिग बॉस चिडले आणि स्वत: जाहीर केले की शालीनने स्वतःच्या इच्छेने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टीना दत्ताच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, त्यानंतर एमसी स्टॅन आणि शालीन यांच्यात भांडण झाले. (TV)

टीना दत्ताने एमसी स्टॅनला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही माघार घेतली नाही. एकमेकांना शिवीगाळ केली आणि काही वैयक्तिक कमेंटही केल्या. दोघांमधील वाद इतका वाढला की स्टॅन आणि शालिन यांनी एकमेकांना शारीरिक दुखापत करू नये म्हणून घरातील इतर सदस्यांना हस्तक्षेप करावा लागला. नंतर टीनानेही एमसी स्टॅनची बाजू घेतली. हे बघून शालीनने घराबाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. (Celebrity)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com