
Bigg Boss 16: टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'बिग बॉस'कडे नेहमीच पाहिले जाते. ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ हिंदीचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी (१२ फेब्रुवारी) रंगणार आहे. यंदा बिग बॉस हिंदीच्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यासाठी काही दिवसांपासून टॉप ५ स्पर्धकांना वोट करण्यासाठी वोटिंग लाईन्स सुरु आहेत. अशातच कोणाला सर्वाधिक मते मिळाली आहेत याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार? सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्व स्पर्धकांच्या चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी रस्त्यावर होर्डिंग्ज लावत समर्थन देत आहेत. तर, काही चाहते सोशल मीडियावरच व्हिडिओच्या माध्यमांतून समर्थन देताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वोटिंग ट्रेंडनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वोटिंग ट्रेंडने सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा निकाल सर्वच स्पर्धकांना मोठा चिंतेत टाकणारा आहे. निकाल पाहिल्यानंतर, नेहमीच चर्चेत असणारा शिव ठाकरे आणि MC स्टॅनच्या चाहत्यांचे कदाचित टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. व्हायरल होत असलेल्या रिझल्ट पोलमध्ये पहिल्या क्रमांकावर प्रियंका चहर चौधरी, दुसऱ्या क्रमांकावर अर्चना गौतम आणि तिसऱ्या क्रमांकावर शलिन भनौत दिसत आहे.
सध्या सर्वत्र शिव ठाकरे आणि MC स्टॅन हे दोन स्पर्धकच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मिळालेल्या माहितीवर विश्वास न ठेवता अंतिम फेरीचा निकाल येईपर्यंत विश्वास न ठेवण्याचा आव्हाहन सध्या चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहे. सध्याच्या मतदानाचा ट्रेंड पाहता 'बिग बॉस १६'च्या सर्वच चाहत्यांना धक्का बसला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.