
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असणारा बिग बॉस हिंदीचा १७ वा सीझन (Bigg Boss-17) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसचे चाहतेही 'बिग बॉस-१७' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्यामध्ये सलमान खानने त्याच्या आगामी शोचा प्रोमोही शूट केला आहे. बिग बॉस १७ च्या प्रोमोचे शूटिंग करतानाचा सलमान खानचा (Actor Salman Khan) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून 'भाईजान'चा हा लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे बिग बॉस १७ चा प्रोमो कधी व्हायरल होणार आहे.
बिग बॉस -१७ च्या तयारीला सुरुवात झाली आहे. सध्या या शोची टीम कंटेस्टंटची फायनल लिस्ट तयार करण्यामध्ये आणि प्रोमचे शूट करण्यामध्ये व्यग्र आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर सलमान खानचा एक नवा फोटो व्हायरल झाला आहे. सलमानचा हा नवा लूक बिग बॉस -१७ चा प्रोमो व्हिडिओसाठी करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. या लूकमध्ये सलमान खानचा वेगळाच अंदाज दिसत आहे.
मंगळवारी बिग बॉसच्या सेटवरून सलमान खानचा फोटो लीक झाला. फोटोमध्ये सलमान खान एका कव्वाली गायकाच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा लूक ७० आणि ८० च्या दशकातील गाण्यांची आठवण करून देणारा आहे. ज्यामध्ये अभिनेते कव्वाली गाण्यांमध्ये तुरा असलेली टोपी घालायचे. सलमान खानचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या सीझनची स्टाइल जरा वेगळी असणार असल्याचे सांगितले जात आहे कारण सलमान खानची स्टाईल खूपच हटके आहे.
सुपरस्टार बिग बॉसच्या प्रोमो शूटचा फोटो काही सोशल मीडिया हँडल्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सलमान खानने केशरी रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केलेला दिसत आहे. त्याच्या या संपूर्ण लूकवरून बिग बॉस- १७ चा प्रोमो संगीतमय जुगलबंदीसारखा असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस १७ पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२३ च्या मध्यावर प्रसारित होईल. पण यावर्षीच्या सीझनला उशीर देखील होऊ शकतो असे देखील सांगितले जात आहे. या सीझनमध्ये कोण-कोण कंटेस्टंट असणार याबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.